शिरुर (तेजस फडके) शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक लाभ कसा देता येईल. यासाठी पुढील काळात मी प्रयत्न करीन असे प्रतिपादन नवनियुक्त चेअरमन शिवाजी दौंडकर यांनी केले. आंबळे-कळवंतवाडी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्यामंध्ये सर्वानुमते चेअरमनपदी शिवाजी शंकर दौंडकर यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला तेव्हा ते बोलत होते.
यावेळी सरपंच सोमनाथ बेंद्रे ,उपसरपंच अनिल नरवडे, माजी सरपंच अतुल बेंद्रे, गाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश बेंद्रे, माजी अध्यक्ष आण्णा बेंद्रे, रामचंद्र दौंडकर, माजी चेअरमन उत्तम बेंद्रे, उल्हास जांभळे व्हाइस चेअरमन शामराव झेंडे , तसेच विकासोचे सर्व संचालक मंडळ आंबळे-कळवंतवाडी गावचे आजी माजी पदाधिकारी तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थ उपस्थित होते .
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…