राजकीय

संभाजीराजेंच नेतृत्व आम्हाला मान्य नाही: मराठा क्रांती मोर्चा

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर संभाजीराजे छत्रपती यांचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही, अशी स्पष्ट भूमिका मराठा क्रांती मोर्चानं घेतली आहे.

औरंगाबाद इथं माध्यमांशी बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी म्हणाले, “छत्रपती शंभाजीराजे आमचं नेतृत्व करु शकत नाहीत. ते गादी आहेत त्या गादीचा आम्ही मान ठेवतो पण त्यांच्या आजूबाजूचे जे लोक आहेत, त्यांनी स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा डाव रचला आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे.

ranjangaon-mutadwar-darshan

छत्रपती शिवराय हेच आमचं नेतृत्व

“काही लोक आमचं नेतृत्व करायला निघाले आहेत. नेतृत्व जर करायचं असेल तर ते सर्वसमावेशक असायला हवं असं आमचं मत आहे. ज्यावेळी कोपर्डीचं प्रकरण घडलं त्यानंतर आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो. पण कालच्या बैठकीला त्यातील कोणीही नव्हतं. मराठा समाजाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी संभाजीराजेंना कोणी दिली? ते आम्हाला मान्य नाही. आम्ही यापूर्वीही सांगितलं होतं की, छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचं नेतृत्व आहेत.

तर पळता भुई थोडी करु

म्हणून आम्ही इशारा देतोय की, “तुम्ही रात्रीच्या अंधारात बैठक घेता, हे काय चाललं आहे. सर्वव्यापक बैठक का घेत नाहीत. अचानक दोन दिवसात बैठक का बोलवता? त्या बैठकीला व्यापक बैठकीचं स्वरुप देता. मोजके चेहरे गोळा करता आणि काय चर्चा करता? मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व कोणाचं नाही. जर व्यवस्थित चर्चा होणार नसेल आणि जवळचा माणूस हाताशी धरुन जर तुम्ही आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेणार असाल तर तुमची पळता भुई थोडी करु” असंही यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

23 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

23 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

23 तास ago