मुख्य बातम्या

Video; शिरुरमध्ये अमोल ज्वेलर्सवर दरोडा; लाखो रुपयांचा ऐवज लंपास

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील सरदार पेठेतील गजबजलेल्या भागात आज बुधवार दि २४ सप्टेंबर २०२५ पहाटे साडेचारच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी अमोल ज्वेलर्स अँड सन्स प्रा. लि. या नामांकित सराफ दुकानावर धाड टाकून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून व्यापारी व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरोड्याची कशी घडली घटना…

चारचाकी वाहनातून आलेल्या दरोडेखोरांच्या टोळक्याने अत्याधुनिक कटरच्या सहाय्याने दुकानाचे शटर उघडले. त्यानंतर त्यांनी काउंटरवरील काचेची शटरं फोडून आत प्रवेश केला. काही मिनिटांतच त्यांनी सोन्याचे दागिने गोळा करुन पळ काढला. प्राथमिक माहितीनुसार लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे समोर आले आहे.

पोलिसांची तातडीची कारवाई…

या घटनेची माहिती मिळताच शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले तसेच शिरुर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे. आसपासच्या परिसरातील रस्ते, टोल नाके आणि चौकांवरील सीसीटीव्हीदेखील तपासण्यात येत आहेत.

व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण…

शिरुर शहरातील गजबजलेल्या सरदार पेठेतील व्यापाऱ्यांनी घटनेनंतर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र अशा मोठ्या चोरीच्या प्रकारामुळे शिरुर शहरातील सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

दरोड्याचा तपास सुरु…

सदर दरोड्याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी गुप्तहेर पथके कार्यरत झाली आहेत. हा दरोडा एखाद्या व्यावसायिक टोळीने टाकल्याचा असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. लवकरच आरोपींचा तपास लावला जाईल, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Video; मुसळधार पाऊसात विजेच्या खांबावर लटकावला बॅनर, महावितरण कारवाई करणार का…?

Video; शिरुर तालुक्यात DJ च्या आवाजाने बैल उधळली; दोन लहान मुल जखमी

Video; करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर अपघात; भरधाव डंपरची घराला धडक

शिरूर तालुका टीम

Recent Posts

टाकळी हाजी पोलीस हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट?; नागरिकांकडून कारवाईची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात जुगार, हातभट्टी दारू, ताडी तसेच अवैध मद्यविक्रीचे धंदे…

8 तास ago

शिरूर तालुक्यात डीपी चोरीच्या घटना; संयुक्त पथकाने गस्तीला सुरुवात…

शिक्रापूर (ओमकार भोरडे): महावितरणच्या रोहित्र (डीपी) चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी महावितरण व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त…

10 तास ago

शिरूर तालुक्यात प्रियकराने केली चिमुकल्याची हत्या; लिव्ह इन मुळे लाईफ धोक्यात…

शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून, एका तीन…

10 तास ago

यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २०५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शालोपयोगी साहित्याचे वाटप

मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक…

15 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांचा वचक; दोन महिला रंगेहात जेरबंद

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या…

15 तास ago

शिरूरमध्ये तरुणाला अडवून पाच जणांकडून बेदम मारहाण; कामावरून काढल्याच्या रागातून हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): "तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले," असा जाब विचारत एका…

15 तास ago