मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात कंटेनर चोरी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द गावच्या हद्दीतून प्लॉटिंग साईटवरील एक लोखंडी कंटेनर अज्ञात चोरट्यांनी क्रेन व ट्रकच्या सहाय्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नारायण कुंडलिक गोरे (रा. तरडोबाची वाडी, गोरेमळा, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नारायण गोरे हे शेतीसोबत प्लॉटिंग व्यवसाय करतात. त्यांनी कारेगाव-बाभुळसर रोडवरील पावतके मंदिराजवळ गट नं. ४००/०१ आणि ४००/०२ मधील जमीन सुजाता संदीप कोकरे यांचेकडून विक्रीसाठी घेतली असुन त्या ठिकाणी कंटेनरचे ऑफिस उभारले होते.

दि १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता तेथे काम करून ते घरी गेले. त्यानंतर दि २१ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा तेथे गेले असता कंटेनर जागेवर दिसून आले नाही. चौकशी अंती स्थानिकांकडून समजले की, त्या ठिकाणी एक क्रेन व ट्रक आले होते. क्रेनने कंटेनर उचलून ट्रकमध्ये ठेवले व अज्ञात चोरटे ते घेऊन गेले.

या चोरीस गेलेल्या कंटेनरचे हा पांढऱ्या व निळ्या रंगाचे पट्टे असलेला, लोखंडी स्वरुपाचा, वरील बाजूस एक होल असलेला, आकार १२×३५ फूट असलेला कंटेनर असून त्याची अंदाजे किंमत तब्बल २ लाख १० हजार इतकी आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादीने मूळ जमीन मालक संदीप कोकरे यांना याबाबत सांगितले व नंतर थेट रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे हे करत आहेत.

कंटेनर चोरी करणारा भामटा जवळचाच…?

बाभुळसर खुर्द गावच्या हद्दीतून प्लॉटिंग साईटवरील एक लोखंडी कंटेनर क्रेन व ट्रकच्या सहाय्याने चोरुन नेणारा भामटा हा जवळच्याच गावातला असुन यापुर्वीही त्याने अनेक घोटाळे केले असुन आत्तापर्यंत या भामट्याने रांजणगाव पोलिस स्टेशन मधील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ओळखीचा गैरफायदा घेतलेला आहे. त्यामुळे आता तरी पोलिस या भामट्याला गजाआड करणार का…? अशी दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु आहे.

Video; शिरुरमध्ये अमोल ज्वेलर्सवर दरोडा; लाखो रुपयांचा ऐवज लंपास

शिरुर तालुक्यात घरफोडी; ४८ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Video; मुसळधार पाऊसात विजेच्या खांबावर लटकावला बॅनर, महावितरण कारवाई करणार का…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

11 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago