मुख्य बातम्या

मांडवगण फराटा-वडगाव रासाईत नाराजीचा उद्रेक; स्वाभिमानी विकास आघाडीमुळे राष्ट्रवादीचे गणित कोलमडणार…?

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा-वडगाव रासाई जिल्हा परिषद गटात यंदा निवडणूक नव्हे, तर सत्तेसाठीचा थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला मानला जाणारा हा गट आता पक्षातील अंतर्गत नाराजीमुळेच ढासळण्याच्या मार्गावर असून, नव्याने स्थापन झालेल्या स्वाभिमानी विकास आघाडीने संपूर्ण राजकीय पटच उलथवून टाकला आहे.

एकत्र आले आणि फुटले…?

अजित पवार तसेच शरदचंद्र पवार गट एकत्र येताच स्थानिक पातळीवरील इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फिरले. राष्ट्रवादी पक्षाने घड्याळ चिन्हावर सुजाता पवार यांना उमेदवारी जाहीर करताच अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आले.यातूनच नाराजीचा भडका उडाला आणि राष्ट्रवादीच्या छत्राखाली राहून दमछाक झालेल्या नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकावत स्वतंत्र आघाडी उभी केली.

स्वाभिमानी विकास आघाडी राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी…?

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या स्वाभिमानी विकास आघाडीने राष्ट्रवादीच्या गडावर थेट चाल केली आहे.सुधीर फराटे, राजीव फराटे पाटील, राजेंद्र गदादे, दादासाहेब कोळपे यांच्यासह पंचायत समितीतील इच्छुकांनी एकत्र येत ‘आता नाही तर कधीच नाही’ असा निर्धार केला आहे.

स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार 

जिल्हा परिषद: दादा पाटील फराटे

पं.स. वडगाव रासाई: विजेंद्र गद्रे

पं.स. मांडवगण फराटा: दीपाली नागवडे

यामुळे राष्ट्रवादीच्या मतांची थेट विभागणी अटळ मानली जात आहे.

भाजपचा ‘चेकमेट’ डाव…

ग्रामपंचायत स्तरावर माजी आमदार ॲड. अशोक पवार यांच्या पॅनलचा पराभव करणारे सचिन शेलार यांना भाजपने थेट जिल्हा परिषदेसाठी मैदानात उतरवत पवार गटालाच खुलं आव्हान दिलं आहे.“त्यामुळे या गटात वडगाव रासाई गावातील दोन उमेदवारांमध्ये थेट लढत होत असुन हि लढत आता पवार विरुद्ध शेलार इतकीच मर्यादित राहिलेली नाही. तर राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा तसेच स्वाभिमानी विकास आघाडी अशीच झालेली आहे.

शिवसेना पक्षाची स्वतंत्र भूमिका….

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मच्छिंद्र गदादे यांनी उमेदवारी दाखल केला आहे. त्यामुळे या गटात आता थेट चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे.

प्रतिष्ठा अन अस्तित्वाची लढाई…? 

जिल्हा परिषदेच्या पहिल्याच कार्यकाळात सभापतीपद भूषवलेल्या सुजाता पवार यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची, तर तीन दशकांपासून राजकारणात सक्रिय असलेल्या दादा पाटील फराटे यांच्यासाठी अस्तित्वाची ठरली आहे. याचबरोबर भाजपचे सचिन शेलार माजी आमदार अशोक पवार यांना राजकीय धक्का देणार का..? हा प्रश्न संपूर्ण शिरुर तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

त्यामुळे हि निवडणूक कोण जिंकणार यापेक्षा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला टिकणार की ढासळणार…? नाराज नेते ‘किंगमेकर’ ठरणार की ‘गेमचेंजर’? भाजपला निर्णायक संधी मिळणार का…? हे प्रश्नच या निवडणुकीमुळे उभे राहिले आहेत. आता उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतरच खरा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

11 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

15 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

16 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago