मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून भाजप आणि शिंदे गटात हालचाली सुरू असतानाच, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत मोठा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिंदेंकडून लवकरच धनुष्यबाण चिन्ह जाणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
इतकंच नाही तर, “माझ्या हातात सत्ता आली तर भारतीय जनता पार्टीचे १५ तुकडे करून दाखवेन”, असं आक्रमक वक्तव्य करत संजय राऊत यांनी भाजपवरही जोरदार टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिवसभरातील पाच महत्त्वाची राजकीय विधानं चर्चेत राहिली आहेत.
“लोकसभा निवडणुकीपूर्वी शिंदेंकडे शिवसेना राहणार नाही”; संजय राऊत
एका मुलाखतीत बोलताना संजय राऊत म्हणाले की, येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगाकडून चिन्ह गोठवले जाईल, असा दावाही त्यांनी केला.
“भाजपाचे १५ तुकडे करेन”; राऊतांचा थेट इशारा
कल्याण-डोंबिवलीतील नगरसेवक प्रकरणावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, सत्ता ईडी, सीबीआय आणि पोलिसांच्या जोरावर चालवली जात आहे. “माझ्यासारख्या माणसाच्या हातात सत्ता आली तर भाजपाचे देशभरात १५ तुकडे करेन”, असं वक्तव्य त्यांनी केलं.
वसंत मोरे यांच्या आरोपांना प्रशांत जगतापांचा पलटवार
महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर वसंत मोरे यांनी काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांच्यावर भाजपाशी हातमिळवणी केल्याचा आरोप केला होता. यावर प्रतिक्रिया देताना जगताप म्हणाले की, “आम्ही वसंत मोरेंच्या विरोधात उमेदवार उभाच केला नाही”. पराभवासाठी काँग्रेसला जबाबदार धरू नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हिंदुस्थान कुणाच्या बापाचा नाही; सहर शेख यांचं वादग्रस्त वक्तव्य
मुंब्रा येथील एआयएमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांनी “हिंदुस्थान कुणाच्या बापाचा नाही, आम्ही भारतीय मुस्लीम आहोत” असं वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
पुण्याच्या महापौर निवडीबाबत मुरलीधर मोहोळांचं स्पष्टीकरण
पुण्याच्या महापौरपदाबाबत बोलताना मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, महापौर निवडीसाठीची प्रक्रिया सुरू असून ३० जानेवारीला उमेदवार जाहीर केले जातील, तर ६ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…