मुख्य बातम्या

कौतुकास्पद; रांजणगाव पोलिसांनी बनावट चलनी नोटा तयार करणा-या व्यक्तीस साहित्यासह केली अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर रामलिंग येथे भाड्याच्या खोलीत राहणारा एक व्यक्ती भारतीय बनावट नोटा तयार करुन त्या बनावट चलनी नोटा कारेगाव येथे वितरित करण्यासाठी घेवुन येणार असल्याची गोपनीय माहिती रांजणगाव MIDC पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून सदर आरोपीस अटक केली असुन मनिष अमर पाल (वय 24 वर्षे) रा. रेवाना.जि. घाटमपुर, उत्तरप्रदेश याच्याविरुध्द रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.11 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8 च्या रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हदीतमधील कारेगाव येथील यश इन चौकात एक व्यक्ती एम एच 34 सी ई 1134 या दुचाकीवरुन भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेवुन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी हि बाब रांजणगाव MIDC चे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना सांगितली.

त्यानंतर पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुलवळ, विजय शिंदे यांचे पथक तयार करुन दोन पंचासह कारेगाव हद्दीतील यश इन चौकात सापाळा लावला. त्यानंतर सकाळी 9 च्या सुमारास तपास पथकास मिळालेल्या माहितीप्रमाणे आरोपी मनिष अमर पाल दुचाकी वरुन MIDC मधील अंतर्गत रोडने जातांना दिसला.

त्यावेळी सापळा लावुन थांबुन राहिलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी त्यांच्याकडील खाजगी वाहनाने त्याचा पाठलाग करुन त्याला पकडून त्याला त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 500 रुपयाच्या 60 नोटा अशा एकूण 30 हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटा मिळुन आल्या. सदरच्या नोटांपैकी बहुतांश नोटांवरती एकच नंबर असल्याने सदरच्या नोटा या बनावट असल्याची पोलीसांची खात्री झाली. सदरच्या नोटा पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे यांनी सोबतच्या पंचासमक्ष पंचनामा करुन जप्त केल्या आहेत.

त्यानंतर त्या व्यक्तीस सदरच्या नोटा कोठुन आणल्या याबाबत विचारणा केली असता त्याने सदरच्या नोटा या त्याने शिरुर, रामलिंग रोड येथील तो राहण्यास असलेल्या फ्लॅटमध्ये स्वतःच तयार केलेल्या असल्याचे सांगीतले. त्यामुळे पोलीस स्टाफ व पंच मनिष पाल याला घेवुन तो राहण्यास असलेल्या शिरुर, रामलिंग रोड येथील खोलीमध्ये जावुन पाहिले असता त्या ठिकाणी भारतीय बनावटीच्या बनावट चलनी नोटा तयार करण्यासाठीचे साहित्य त्यामध्ये नोटा तयार करण्यासाठीचे पांढरे कागद, कलर प्रिंटर स्कॅनर, हिरव्या रंगाची पावडर, छाप्याची लाकडी फ्रेम, वेगवेगळ्या रंगाचे कलर स्प्रे, इत्यादी साहित्य मिळुन आले.

या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला मनिष पाल याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला शिरुर न्यायालयात हजर केले असता दि 23 डिसेंबर पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

 

बनावट नोटांच दिल्ली कनेक्शन…?

सदर गुन्हयातील बनावट नोटांचे रॅकेटचे धागेदोरे हे दिल्ली पर्यंत असण्याची शक्यता असुन पोलीस त्याबाबत पुढील अधिक तपास करत आहेत. पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्‌या प्रमाणावर बनावट नोटा व त्या तयार करण्यासाठीचे मिळुन आले असल्याने सदर गुन्हयाचा सखोल तपास करण्याबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी सुचना दिलेल्या आहेत.

सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल, पुण्याचे अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव MIDC चे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, संतोष औटी, अभिमान कोळेकर यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे हे करीत आहेत.

शिरुर शहरात 16 डिसेंबर रोजी जगप्रसिद्ध आध्यात्मिक मोटीवेशनल स्पीकर ब्रह्माकुमारी शिवानी यांचं व्याख्यान

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

1 दिवस ago