shirur-police
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात रोड रॉबरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. आरोपी सध्या पोलिस कोठडी रिमांड मध्ये असून, पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशन करत आहेत.
शिरुर शहरात रात्रीच्या वेळी शहराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची जबर दस्तीने लुटमार करून मोबाईल चोरी करण्याच्या घटना वाढू लागल्या होत्या. त्याबाबत पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण अंकित गोयल यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्हयाचे अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. आजूबाजूच्या परीसरातील गोपनीय बातमीदार सतर्क केले व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची माहिती प्राप्त करण्यास सुरूवात केली. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदरचे गुन्हे हे शिरूर शहरात राहणारे
१) शिरीष सोपान जाधव, वय १९ वर्ष, रा. होलार आळी, शिरूर, ता. शिरूर जि पुणे
२) संतोष मारूती ढोबळे, वय १९ वर्षे, रा. वाडा कॉलनी, शिरूर ता. शिरूर, जि. पुणे यांनी केले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांचा शोध घेवून दोघांना शिरूर शहरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्यांनी शिरूर शहरात चार गुन्हे केल्याचे सांगितले असून दोन्ही आरोपींच्या ताब्यातून एकूण चार मोबाईल ५२,०००/- रु.कि. चे तसेच गुन्हयात वापरलेल्या दोन मोटार सायकल रु. ४५,०००/- किंमतीच्या जप्त करण्यात आलेल्या आहेत.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, पुणे विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पो. स्टे.चे पोलिस निरीक्षक संजय जगताप, स्था.गु.शा. कडील पो.स.ई. गणेश जगदाळे, पोलिस अंमलदार तुषार पंदारे, राजू मोमीण, अतुल डेरे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, शिरूर पो स्टे चे पो.स.ई. एकनाथ पाटील, पोलिस अंमलदार नाथासाहेब जगताप, रघुनाथ हाळनोर यांनी केली आहे. आरोपी सध्या पोलिस कोठडी रिमांड मध्ये असून, पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशन करत आहे.
कौतुकास्पद; रांजणगाव पोलिसांनी बनावट चलनी नोटा तयार करणा-या व्यक्तीस साहित्यासह केली अटक
शिरुर तालुक्यात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला रांजणगाव पोलीसांनी केली चार तासात अटक
न्हावरा-केडगाव रस्त्यावर टाकलेल्या मृतदेहाची ओळख पटली; दोघांना अटक…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…