फिर्यादी महीलेच्या स्कुटीसह घर पेटवून देण्याचा प्रयत्न
शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील फकीर मोहल्ला येथील बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या जुलेखा मलिक शेख या फिर्यादी महिलेने तुझ्या मैत्रिणींना बिल्डींग मध्ये घेवून येत जाऊ नको. माझ्या घरीपण मुली आहे. तुझ्यामुळे त्यांच्यावर वाईट परिणाम होईल अस म्हणाल्याने आरोपी अजहर जमीर खान याने राग मनात धरुन फिर्यादीच्या स्कुटीसह घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. ३) जानेवारी रात्री ०८:३० वा ते दि ०४ जानेवारी सकाळी ०७:०० वा चे दरम्यान मौजे शिरुर गावचे हददीत फकीर मोहल्ला येथे इसम नामे अजहर जमिर खान, रा- अजिम भाई चाळ, भाजी बाजार, शिरुर जि.पुणे याने मी त्यास “तु तुझ्या मैत्रीणींना बिल्डींगमध्ये घेवुन येत जावु नकोस, आमचे घरीपण मुली आहेत, तुझ्यामुळे माझे मुलींवर वाईट परीणाम होईल’ असे बोलल्याचा राग मनात धरुन स्कुटी सह फिर्यादीचे घर पेटवुन देण्याच्या उद्देशाने घराचे खाली बेसमेंट पार्किग मध्ये उभी केलेली स्कुटी पेटवुन देवुन त्यात ५०,०००/ रु किंमतीची अँक्टीव्हा स्कुटर रजि नं MH 12 QN 7103 ही जळुन खाक झालेली आहे. व त्यानंतर सायंकाळी ५.०० वा. चे सुमारास फिर्यादीच्या घरी येवून ‘तुम्ही पोलीसात तक्रार दिली तर तुमचे एकेकाचे मर्डर टाकतो.’ अशी धमकी दिली आहे. म्हणुन त्याचे विरुद्ध शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरक्षक सुनील उगले हे करत आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…