मुख्य बातम्या

महावितरणच्या माध्यमातुन विरोधकांचा सर्वसामान्य लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न; शेखर पाचुंदकर

शिरुर (तेजस फडके) मंचर येथील २८ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या सभेला मोठ्या प्रमाणावर लोकांनी उपस्थिती दाखवली म्हणुन विजप्रवाह खंडित करुन विरोधकांकडुन महावितरणच्या माध्यमातुन सणासुदीला आमच्या लोकांवर सुड उगवायचा प्रयत्न होतोय अशी शंका उपस्थित करत महावितरणच्या माध्यमातुन सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम विरोधक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंबेगाव-शिरुरचे तालुकाध्यक्ष शेखर पाचुंदकर यांनी केला आहे.

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार देवदत्त निकम यांचा प्रचार दौरा सध्या सुरु आहे. यावेळी शेखर पाचुंदकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

गणेगाव खालसा येथील पद्मावती वस्ती येथे पाचुंदकर बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, गणेगाव येथे विजेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. मंचर येथील २८ तारखेच्या सभेनंतर काही ठिकाणीं जाणून बुजून वीज खंडित केली जात आहे असा आम्हाला संशय आहे. तसेच वर्षातुन एकदा येणाऱ्या दिवाळी सणाची सध्या सगळीकडे धामधुम सुरु असताना सुद्धा दिवाळीचा सण हा अंधारात गेला आहे.

 

जे कर्मचारी आणि अधिकारी कालपर्यंत आमच्या विजेच्या तक्रारी ऐकून घेत होते. त्याच योग्य निराकरण करत होते. ते आज आमचा फोन सुद्धा उचलत नाहीत. त्यामुळे फक्त मंचरच्या ‘त्या’ सभेला इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी उपस्थिती दाखवली म्हणुन विरोधकांकडुन महावितरणच्या माध्यमातुन सणासुदीला आमच्या सर्वसामान्य लोकांवर सुड उगवायचा प्रयत्न होतोय का…?’ असा प्रश्न उपस्थित पाचुंदकर यांनी उपस्थित केला आहे.

 

पुढे बोलताना पाचुंदकर म्हणाले, ‘निवडणुकीचे हे १५ दिवस निघुन जातील. मात्र या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढणे गरजेचे आहे. तसेच बिबट्याच्या संदर्भात उपायोजना, दिवसा विजेसाठी उपाययोजना कराव्या लागतील. परंतु या भागात शरद पवार यांच्या माध्यमातुन चासकमानच्या कॅनॉलद्वारे शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांची शेतीच्या उत्पन्नामुळे भरभराट झालेली आहे. या शेतकऱ्यांना महावितरणच्या माध्यमातून वेठीस धरण्याचं काम विरोधक करत असल्याचा तीव्र शब्दांत पाचुंदकर यांनी निषेध व्यक्त केला आहे.

 

आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील शिरुर तालुक्यातील ४२ गावांमधील रांजणगाव पंचायत समिती गणात राष्ट्रवादीचे उमेदवार देवदत्त निकम यांचा आज शनिवार (दि २) रोजी प्रचार दौरा होता. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आंबेगाव-शिरुर मतदार संघातील शिरुर तालुक्यातील ४२ गावांमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जबाबदारी शेखर पाचुंदकर, शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर आणि टाकळी हाजी गावचे माजी सरपंच दामू घोडे या तिघांनी खांद्यावर घेतल्याने निकम यांची चांगलीच ताकद वाढली आहे.

कारखान्याचे कर्मचारी तुम्हाला निवडणुकीसाठी वापरायचे असल्याने तुम्ही कारखाना सुरु केला नाही

शिरुरकरांना शरद पवारांनी सांगितली सन १९८० ची ‘ती’ आठवण

महाराष्ट्र राज्यात सत्तापालट झाल्यानंतर घोडगंगा कारखाना नक्कीच चालु करु; शरद पवार

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

3 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago