मुख्य बातम्या

शिरुरकरांना शरद पवारांनी सांगितली सन १९८० ची ‘ती’ आठवण

शिरुर (तेजस फडके) शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही कार्यकर्ते दिवाळीनिमित्त शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी काही जुन्या आठवणींना उजाळा देताना पवार म्हणाले सन १९८० साली निवडणुक झाली. त्यावेळी माझ्या नेतृत्वाखाली ५८ आमदार निवडुन आले. त्यामुळे मी विरोधी पक्ष नेता झालो आणि विरोधी पक्षाचं काम करायला लागलो. पण आठ दिवसांसाठी मी काही कामानिमित्त ‘इंग्लंड’ ला गेलो. इंग्लंड वरुन परत आल्यानंतर ५८ पैकी ५२ लोक पक्ष सोडुन गेले आणि मी फक्त ६ लोकांचा नेता राहिलो अशी स्थिती महाराष्ट्राने पाहिलेली आहे.

पण त्यानंतर महाराष्ट्रात जी निवडणुक झाली. त्या निवडणुकीत पक्ष सोडुन गेलेले ५२ लोक पराभुत झाले. कारण सर्वसामान्य लोकांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला. या निवडणुकीत अशीच स्थिती महाराष्ट्रात होणार असुन मी महाराष्ट्रात दौऱ्यानिमित्त फिरत असताना जे निष्ठावंत आहेत त्यांच्या पाठीमागे ताकद उभी करायची असं मतदारांनी ठरवलं असुन त्यामुळे शिरुर-हवेली मतदार संघात यावेळी अशोक पवार यावेळी नक्कीच विजयी होईल असे यावेळी शरद पवार म्हणाले.

पुढे बोलताना पवार म्हणाले, एक काळ असा होता की विकासात महाराष्ट्राचा नंबर पहिला होता. परंतु सध्या विकासात महाराष्ट्राचा नंबर हा सहावा आहे. बाकीची राज्य पुढे गेली मात्र महाराष्ट्र आज विकासाबाबत पाठीमागेच आहे. कारण ज्यांच्या हातात राज्याची सत्ता आहे. त्यांना या सत्तेचा उपयोग कशासाठी करायचा याची जाण नाही.

 

शरद पवारांकडुन अशोक पवारांचे कौतुक… 

राजकीय जीवनात वैयक्तिक आयुष्यापेक्षा समाजहितासाठी समाजसेवेला वाहुन घ्यावे लागते. आमदार अशोक पवारांनी ज्या प्रकारे शिरुर-हवेलीच्या सार्वांगिण विकासाचा आलेख उंचावला आहे, तो दखलपात्र आहे. ज्या राजकीय पुढाऱ्यांच्या पाठीशी सर्वसामान्य जनता सक्रिय असते तोच खरा नेता असतो. आज ज्या प्रकारे शिरुर-हवेलीची जनता अशोक पवारांच्या पाठीशी ठामपणे, निष्ठेने आणि विश्वासाने उभी आहे. ते पाहुन अशोक पवार हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे नेते आहेत. हेच अधोरेखित होते, अशी स्तुती सुमने शरद पवार यांनी अशोक पवार यांच्यावर उधळली.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago