न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील पारोडी येथे उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असुन सदर निवडणूक विद्यमान सरपंच तथा अध्यासी अधिकारी वर्षा लाला येळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या निवडणुकीत उपस्थित सदस्यांपैकी बजरंग तात्या सातकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने अध्यासी अधिकारी वर्षा लाला येळे व ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय नारायण कुंभार यांनी अर्ज वैध असल्याचे घोषित केले.
त्यानंतर दुपारी 2 वाजता बजरंग तात्या सातकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली असुन यापूर्वी ग्रामपंचायत पारोडीच्या उपसरपंचपदी दिपाली गणेश कवितके कार्यरत होत्या. मात्र सर्व सभासदांना संधी मिळावी या हेतूने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने नवनिर्वाचित उपसरपंच बजरंग तात्या सातकर यांना कामकाजाची संधी प्राप्त झाली आहे.
या निवडप्रक्रियेवेळी सरपंच तथा अध्यासी अधिकारी वर्षा लाला येळे, ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय नारायण कुंभार यांनी कामकाज पाहिले. यावेळी विशाल गव्हाणे, मेजर योगेश टेमगिरे, शशिकांत कोकरे,माजी सरपंच कमल शिवले, चिंतामण टेमगिरे, लालासो येळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत लिपिक सुशांत टेमगिरे यांनी केले. तर अध्यासी अधिकारी वर्षा लाला येळे यांनी आभार मानत नवनिर्वाचित उपसरपंच बजरंग तात्या सातकर यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…