मुख्य बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत झळकलेला फोटो शिरूर तालुक्यातील…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ची घोषणा केली आहे. आता, या योजनेच्या संदर्भाने केलेल्या एका जाहिरातीवरुन सरकावर टीका होत आहे. कारण, तीर्थक्षेत्र योजनेच्या जाहिरातीवर वापरण्यात आलेल्या व्यक्तीचा फोटो पाहता, ती व्यक्ती 3 वर्षांपासून घरातून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित छायातित्र हे शिरूर तालुक्यातील वरूडे येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे यांचे असून, ते तीन वर्षांपासून बेपत्ता आहेत.

राज्य सरकारकडून सध्या योजनांची चलती असून लाडकी बहीण, लाडका भाऊ आणि वयोवृद्धांसाठीही योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 60 वर्षांवरील नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार असून देशभरातील 66 तीर्थक्षेत्रांसाठी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना 30 हजारांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ची घोषणा केली आहे. आता, या योजनेच्या संदर्भाने केलेल्या एका जाहिरातीवरुन सरकावर टीका होत आहे. कारण, तीर्थक्षेत्र योजनेच्या जाहिरातीवर वापरण्यात आलेल्या व्यक्तीचा फोटो पाहता, ती व्यक्ती 3 वर्षांपासून घरातून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावरुन, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. गेले तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो “आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन” या मुख्यमंत्र्यांच्या जाहिरात फलकावर दिसल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला आहे.

शिरूर तालुक्यातील वरूडे येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे गेले तीन वर्षापासून आपल्या कुटुंबापासून बेपत्ता होते, त्यांचा कुटुंबाने सर्वत्र शोध देखील घेतला. परंतु, तांबे कुटुंबीयांना ज्ञानेश्वर तांबे आढळून आले नाहीत. अखेरीस तीन वर्षानंतर मुख्यमंत्र्यांच्या “आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन” या जाहिरात फलकावर ज्ञानेश्वर तांबे यांचा फोटो दिसल्याने कुटुंबीयांस धक्काच बसला आहे. याबाबत ज्ञानेश्वर तांबे यांचे चिरंजीव भरत ज्ञानेश्वर तांबे यांनी सांगितले की, ‘आमचे वडील गेले तीन वर्षापासून हरवले होते आम्ही त्यांचा सर्वत्र शोध घेत होतो. परंतु ते सापडत नव्हते, आता त्यांचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत दिसून आल्याने आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला आहे, मुख्यमंत्री ज्याप्रमाणे जेष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवणार आहे, त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या वडिलांचे दर्शन घडून द्यावे ही विनंती.’

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी कितीही कंठशोष करुन सांगितलं तरीही हे सरकार सर्वसामान्य नसल्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या कृतीतून दिसून येते. कारण, हे सरकार जाहिरातबाजी करणारं सरकार आहे, चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला असे हे सरकार आहे. वारकऱ्यांच्या संबंधाने जी पर्यटन योजना सरकारने जाहीर केली, त्यातही स्वत:चीच पाठ थोटपून घेतली जात आहे. यावेळी, त्यांनी जाहिरातीवर लावण्यात आलेल्या फोटोचाही संदर्भ दिली. शिरुरमधील ज्ञानेश्वर तांबे व्यक्तीचा फोटो या जाहिरातीवर लावण्यात आला आहे. मात्र, ते बेपत्ता असून तांबे कुटुंबीय गेल्या 3 वर्षांपासून शोधत होते. जेव्हा ज्ञानेश्वार तांबे यांचे चिरंजीव भरत तांबे यांनी तक्रार केली, तेव्हा हे सरकार स्वत:च्या जाहिरातीसाठी लोकांच्या भावनांशी खेळते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, असेही अंधारे यांनी म्हटले.

दिलीप वळसे पाटील यांची कन्या तुतारीच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढविणार? शरद पवार म्हणाले…

दिलीप वळसे पाटील यांच्या तत्परतेमुळे वाचला एकाचा प्राण…

शिरूर तालुक्यात खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या; ११ जणांवर गुन्हे दाखल…

शिरूर तालुक्यात अनोळखी व्यक्तीसोबत अल्पवयीन मुलगी करत होती चॅटिंग…

‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या बातमीचा प्रभाव; शिरुर न्यायालयाने केली नियमित बंदुकधारी पोलिसाची मागणी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

11 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

11 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

12 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

12 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

17 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

17 तास ago