Shikrapur Police Station

शिरूर तालुक्यात खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या; ११ जणांवर गुन्हे दाखल…

क्राईम

शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील एका व्यवसायिकाने खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे नवनाथ भंडारे, अमोल गव्हाणे, शांताराम सावंत, संतोष भंडारे, अजय यादव, किशोर खळदकर, संदीप अरगडे, जनार्धन वाळूंज, मामा सातव, सुधाकर कांतीलाल ढेरंगे, कांतीलाल रामचंद्र ढेरंगे या अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोरेगाव भीमा येथील किराणा व्यवसायिक किरण कुलकर्णी यांचा वैष्णवी सुपर मार्केट नावाने व्यवसाय आहे. कोरोना काळामध्ये व्यवसाय अडचणीत आल्यानंतर किरण कुलकर्णी यांनी काही खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतलेले होते. शिवाय, गावातील सुधाकर ढेरंगे व कांतीलाल ढेरंगे यांच्या सोबत भागीदारी मध्ये इमारत बांधलेली होती. खाजगी सावकारांना व्याज दिल्याने किरण अडचणीत आल्याने त्यांनी ढेरंगे यांच्या सोबत भागीदारीत असलेली सदनिका व गाळा विक्रीचा निर्णय घेतला. मात्र सदनिका व गाळा खरेदीसाठी व्यक्ती आल्यास ढेरंगे त्यांना सदर इमारत घेऊ देत नव्हते आणि झालेला व्यवहार मोडत होते. मात्र ज्या खाजगी सावकारांकडून किरण यांनी पैसे घेतले ते सर्व जण त्यांना मानसिक त्रास देत दमदाटी करत असल्याने सावकार व ढेरंगे देत असलेल्या त्रासाला कंटाळून किरण सुरेश कुलकर्णी (वय ४८ वर्षे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे) यांनी भीमा नदीच्या पाण्यात आत्महत्या केली.

दरम्यान, महेश सुरेश कुलकर्णी यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी नवनाथ भंडारे, संतोष भंडारे, संदीप अरगडे तिघे रा. वढू बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे, सुधाकर कांतीलाल ढेरंगे, कांतीलाल रामचंद्र ढेरंगे, अमोल गव्हाणे (तिघे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे), शांताराम सावंत (रा. वाडागाव ता. शिरुर जि. पुणे), अजय यादव, जनार्धन वाळूंज (रा. लोणीकंद ता. हवेली जि. पुणे), जातेगाव खुर्दचे माजी सरपंच किशोर खळदकर (रा. जातेगाव खुर्द ता. शिरुर जि. पुणे), मामा सातव (रा. वाघोली ता. हवेली जि. पुणे) या अकरा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतिक जगताप हे करत आहे.

शिरूर तालुक्यात पत्नीच्या विरहाने पतीची गळफास घेऊन आत्महत्या…

शिरूर तालुक्यात लग्नाच्या आमिषाने विवाहितेवर अत्याचार…

सिंघमगिरी; रांजणगाव MIDC पोलिसांनी सिनेस्टाईल सापळा रचत चार अपहरण झालेल्या कामगारांची केली सुटका

खळबळजनक! शिरूर तालुक्यात करंट देऊन पत्नीचा केला खून; कारण…

Video: शिरूर तालुक्यात दुचाकींची समोरासमोर जोरात धडक; जागीच मृत्यू…