purva-walse-patil

दिलीप वळसे पाटील यांची कन्या तुतारीच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढविणार? शरद पवार म्हणाले…

मुख्य बातम्या राजकीय

पुणेः राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या अ‍ॅड. पूर्वा वळसे पाटील या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत. दुसरीकडे, अजित पवार गटात असलेल्या दिलीप वळसे पाटील यांची कन्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत शरद पवार यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.

दिलीप वळसे पाटील यांची कन्या शरद पवार गटाकडून विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत का? असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, ‘आमच्या बाजूने आमचा निर्णय आमचे स्थानिक नेते घेतील. या पलीकडे आणखी कोणाचं नाव घ्यायची गरज नाही.’ दरम्यान, अतुल बेनके यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. याबाबत शरद पवार म्हणाले की, ‘हे अतुल बेनके कोण आहेत? एखाद्या पक्षाच्या अध्यक्षाने यांना उत्तर द्यावं, इतका महत्वाचा माणूस आहे का हा? तुम्ही कोणाबद्दल विचारायला हवं अन् कोणाला महत्व द्यायला हवं, हे ठरवायला हवं.’

दिलीप वळसे पाटील हे आपल्या मतदारसंघात विकास करायला कमी पडले का? असे विचारले असता शरद पवार म्हणाले की, दिलीप वळसे यांनी त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले नाहीत का? हे त्यांना विचारा, मुळात ते किती वर्षे सत्तेत आहेत. 35 वर्षे आमदार, त्यापैकी 25 वर्षे मंत्री आहेत. आता ज्यांना 25 वर्षात विकास करता आला नाही ते आता काहीतरी सांगतात. मुळात हा संधीसाधूपणा आहे. अनेकांना अनेक वर्षे संधी देऊन ही त्यांना कामं करता आलेली नाहीत. जनतेला न्याय देता आलेला नाही, याला उत्तर आता शोधावं लागेल. यासाठी राज्याची सत्ता हातात घ्यावी लागेल.’

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणावर शरद पवार म्हणाले की, ‘मी जी माहिती घेतली, ती देशाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. आपल्या देशात आणि राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक परंपरा आहे. त्या चौकटीच्या बाहेर अधिकारी जायला लागले, ही अतिशय गंभीर बाब आहे. केंद्र सरकार याची अतिशय गांभीर्याने दखल घेतील, योग्य ती कारवाई करतील.’

दिलीप वळसे पाटील यांच्या तत्परतेमुळे वाचला एकाचा प्राण…

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अडचणीत वाढ…

दिलीप वळसे पाटील यांना भरसभेत अश्रू अनावर…

पुर्वा वळसे पाटील यांचा बनावट अकाउंटबाबत सोशल मीडियावरून खुलासा…

अजित पवार यांना धक्का! दिलीप वळसे पाटील परतीच्या मार्गावर…

दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट; चर्चांना उधाण…

ग्रामपंचायत निवडणूक! दिलीप वळसे पाटील यांना स्वतःच्या गावातच धक्का…