क्राईम

शिरूर तालुक्यात अनोळखी व्यक्तीसोबत अल्पवयीन मुलगी करत होती चॅटिंग…

शिरूर दि. २१ (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात अनोळखी व्यक्तीसोबत चॅटिंगवरून आई रागवल्याने मुलगी घर सोडून निघून गेल्याची घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध आईने तक्रार दिल्याने शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर शहरातील बागवाननगर येथून २० जुलै रोजी संध्याकाळी ०७, ३० वा सुमारास अल्पवयीन मुलगी अनोळखी व्यक्तीसोबत इन्स्टाग्रामवर चॅटींग करत असल्याचे तिच्या आईने पाहीले. आई रागावल्याने तिने राहत्या घराचा दरवाजा लावून पलायन केले आहे.

याबाबत सविस्तर हकिकत अशी की, मुलीची आई व त्यांची अल्पवयीन मुलगी हे दोघेच घरात असतात. राहत्या घरात असताना मुलगी ही एक अनोळखी मुलासोबत इंन्स्टाग्रामवर चॅटीग करत असताना आईने पाहीले. त्या मुलीला आई रागावल्याने ती घरातून कोणास काही एक न सांगता रागाच्या भरात घराचे दरवाजाचा कडी कोंडा लावून घरातून निघून गेली आहे. परंतु, तिला कोणीतरी अज्ञान पणाचा फायदा घेऊन आईच्या कायदेशीर रखवालेतून फूस लावून पळून नेले आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध आईने तक्रार दिल्याने शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरूर शहरातून चारचाकी मारुती स्विफ्ट डिझायरची चोरी…

शिरुर तालुक्यात ऑनलाईन अश्लील चॅटिंगमुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड

बहिणीसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या कारणावरुन भावाने प्रियकराला पाठवले यमसदनी…

शिरूर तालुक्यात घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग…

शिरुर न्यायालयाच्या आवारात माजी उपसरपंचाचा दारु पिऊन धिंगाणा; पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिरुर न्यायालयाच्या आवारात माजी उपसरपंचांच्या धिंगाण्यानंतर पुन्हा मित्र-मैत्रिणीची हाणामारी….

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

16 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

20 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

20 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

20 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

20 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

20 तास ago