शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला विषारी साप चावला होता. रुग्णालयात उपचारादरम्यान एका इंजेक्शनची आवश्यकता होती. महाराष्ट्र राज्यांचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे रुग्णाचा प्राण वाचला आहे.
शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील ताराचंद (काका) कोहकडे यांना शेतात काम करत असताना घोनस जातीचा साप चावला होता होता. विषारी साप चावल्याने त्यांना तातडीने शिरूर येथील खाजगी रुग्णालयात घेऊन जात त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले होते. परंतु, त्यांना शुगर, बीपी असल्यामुळे त्यांच्या पायाला सुज आली होती. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, जो पर्यन्त पेशंटची शुगर नॉर्मल होत नाही तो पर्यन्त पेशंटला ASV नावाचे इन्जेक्शन प्रत्येक तासाला एक असे २४ तासात २४ इन्जेक्शन द्यावे लागतील. त्यानंतर पेशंटचे नातेवाईक आजुबाजुच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये गेले असता त्यांना फक्त दहा इन्जेक्शनच उपलब्ध झाले.
रुग्णाचे पुतणे अजित कोहकडे यांनी महाराष्ट्र राज्यांचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना तातडीने संपर्क करून या सगळ्या गोष्टीची कल्पना दिली. बोलून झाल्यानंतर लगेच १० मिनीटामध्ये त्यांना पीए रामदास वळसे पाटील यांचा फोन आला. मंचरला येऊन इन्जेक्शन घेऊन जा असा निरोप दिला. तातडीने ते इन्जेक्शन घेऊन पेशन्टला देण्यात आले. त्यामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत झाली.
इन्जेक्शन भेटत नव्हते ते सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधून तप्तरतेने २४ ASV इंजेक्शन उपलब्ध करुन दिले. त्यामुळे आम्हाला खुप मोठा आधार मिळाला. पेशंटला धोक्याबाहेर काढण्यास मदत झाली. आम्ही साहेबांचे खुप- खुप आभारी आहोत.
– अजित कोहकडे, पेशंटचे पुतणे
शिरूर शहरातील दशक्रिया विधीघाट झालाय जुगार आणि दारू पिणाऱ्यांचा अड्डा…
शिरूर तालुक्यात खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या; ११ जणांवर गुन्हे दाखल…
शिरुर-पाबळ रस्त्यासाठी होतोय चक्क मातीचा वापर; सार्वजनिक बांधकाम उपविभाग निद्रीस्त