रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे) आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील निफॅब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गोदामाला अचानक लागलेल्या आगीत गोदामासह कार्यालयीन केबिन व साहित्य पूर्णतः जळून खाक झाल्याचे रांजणगाव MIDC पोलिसांनी सांगितले.
याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव MIDC तील आयटीआयच्या बाजुला असलेल्या या गोदामाला शनिवार (दि २७) पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत या गोदामाचे शेड, कार्यालयीन केबिन, पुठ्यांचे बॉक्स व पॅकेजिंगचे साहित्य पुर्णपणे जळून खाक झाले. पॅकेजिंगचे काम असलेल्या या गोदामात शनिवारी सोमनाथ बापु गवळी हे सुरक्षा रक्षक असताना त्यांना कंपनी गोदामातुन धुर येताना दिसल्याने गवळी यांनी गोदामाकडे धाव घेतली. तेव्हा गोदामाच्या चारही बाजूनी जाळ दिसला.
त्यांनी हि बाब कंपनीचे गोदाम प्रतिनिधी उत्तम धायगुडे यांना कळविली. धायगुडे यांनी हि बाब कंपनी ऑपरेशन मॅनेजर चैतन्य विलासराव दलाल यांना हा प्रकार कळविल्यानंतर त्यांनी तातडीने गोदामाकडे धाव घेतली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असुन नुकसानीचा नेमका तपशील समजु शकला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
रांजणगाव एमआयडीसी अग्निशमन दलाच्या केंद्रातील कर्मचारी यांनी सुमारे दोन तास पाण्याच्या सहाय्याने आग पूर्णतः आटोक्यात आणल्याचे सांगण्यात आले. या घटनेबाबत कंपनीचे मॅनेजर चैतन्य विलासराव दलाल (रा. शिवतीर्थ सोसायटी, रहाटणी, पिंपरी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले तसेच रांजणगावचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देत सविस्तर माहिती घेतली.
शिरुर तालुक्यातील शिंदेवाडी येथे बैलगाडा घाटात भावकीत तुंबंळ हाणामारी; एकाचा मृत्यू
शिक्रापुर येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पवयीन युवतीचा विनयभंग
भीषण अपघात; लोणीकंद-थेऊर रस्त्यावर अपघातात दोघांची प्रकृती चिंताजनक तर पाच जण जखमी
रांजणगाव गणपती (तेजस फडके) सायबर अवेअरनेस २०२५ उपक्रमाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस विभागातर्फे रांजणगाव एमआयडीसी…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव गणातून पंचायत समिती निवडणूक लढवणार आहे, असा ठाम विश्वास…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २७) दुपारी एक भावनिक…
शिरूर : राज्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील पारोडी गावातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली सुप्रसिद्ध पिरसाहेबांची पारंपरिक यात्रा…
शिंदोडी (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर चिंचणी येथील जिल्हा परिषद शाळेत माजी…