शिरूर तालुका

शिरूर तालुक्यात पहिल्यांदाच सुरू झालेली कावड यात्रा उत्साहात पार

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्याच्या बेट भागातील श्रद्धाळूंसाठी सोमवारी (दि.१८) धर्म जागरण समिती व शिवबा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पहिलीच श्री क्षेत्र टाकळी हाजी ते श्री क्षेत्र रामलिंग अशी कावड यात्रा उत्साहात पार पडली.

सकाळी सात वाजता टाकळी हाजी येथील घोडनदी तीरावर गंगा पूजन करून यात्रेची सुरुवात झाली. कावडीधारी तरुणांच्या ‘हर हर महादेव’ घोषणांनी वातावरण दुमदुमले. डोंगरगण, आमदाबाद, अण्णापूर आदी गावांतील ग्रामस्थांनी कावड यात्रेचे पूजन, फुलांची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीने भव्य स्वागत केले. दुपारी दोन वाजता यात्रेचा समारोप श्री क्षेत्र रामलिंग येथे झाला.

रामलिंग देवस्थान विश्वस्त मंडळाने यात्रेतील भाविकांसाठी विशेष अभिषेक व दर्शनाची सोय केली होती. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिरूर पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली होती.या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी टाकळी हाजीसह परिसरातील उद्योजक, ग्रामस्थांनी मोठे सहकार्य केले. यात्रेचे नियोजन धर्म जागरण समितीचे माऊली घोडे व शिवबा संघटनेचे सोमनाथ भाकरे यांनी केले. रामलिंग गावचे विश्वस्त नामदेव घावटे व धर्म जागरण समितीचे सचिन तागड यांनी यात्रेत सहभागी सर्व तरुण भक्तांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

4 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

4 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

4 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

19 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago