मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात गायरान जमिनीवर वृक्षारोपण करण्याबाबत उदघाट्न कार्यक्रमा दरम्यान वाद

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तब्बल ५४ एकर गायरान जमिनीवर वृक्षारोपण करण्याच्या निर्णयावरुन गावात मोठा वाद निर्माण झाला आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स यांच्या सी एस आर फंडातून तसेच साद फाउंडेशन यांच्या माध्यमातून या गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या उपक्रमाला आता काही ग्रामस्थांनी जोरदार विरोध दर्शवला आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावाच्या मालकीची ५४ एकर गायरान जमीन हि भविष्यातील सार्वजनिक प्रकल्प, खेळाचे मैदान, शासकीय योजना तसेच इतर विकासकामांसाठी महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे संपुर्ण ५४ एकर गायरान जमीन वृक्षारोपणासाठी वापरण्याऐवजी त्यातील किमान ५० टक्के जमीन भविष्यातील प्रकल्पांसाठी राखीव ठेवावी, अशी मागणी करण्यात आली होती.

यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अनिल माणिक पवार आणि स्थानिक ग्रामस्थांनी शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, शिरुरचे गटविकास अधिकारी महेश डोके तसेच चिंचणी ग्रामपंचायत यांना लेखी निवेदन देत या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली होती. मात्र, निवेदन दिल्यानंतरही ग्रामपंचायतीने तब्बल ५४ एकर गायरानापैकी जवळपास ६० टक्के क्षेत्रावर वृक्षारोपण केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली बुधवार (दि 20) रोजी सकाळी 10 च्या सुमारास चिंचणी येथे या कार्यक्रमाचे उदघाटन पार पडत असताना शिवसेना नेते अनिल पवार यांनी भर कार्यक्रमात याचा जाब विचारला. त्यामुळे काहीवेळ गोंधळ निर्माण झाला. त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला.

यावेळी आरोप करताना अनिल पवार यांनी सांगितले की, ग्रामस्थांचा आवाज डावलून निर्णय घेतला जात आहे. तसेच चिंचणी ग्रामपंचायत एकतर्फी कारभार करत असुन गावाच्या सामूहिक मालमत्तेबाबत सर्व ग्रामस्थांशी सखोल चर्चा करुन आणि सर्वानुमते निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याबाबत चिंचणी गावचे प्रभारी ग्रामसेवक सुरेश साळवे यांना संपर्क साधले असता, चार महिन्यांपुर्वी चिंचणी गावची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे. परंतु मी येण्यापुर्वीच गायरान जमिनीत वृक्षारोपण करण्याबाबत विशेष ग्रामसभा घेऊन पुर्वीच्या ग्रामसेवकांनी ठराव घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत चिंचणीच्या माजी सरपंच आणि प्रशासक परिघा पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सहा महिन्यापासुन गायरान जागेत एलआयसी हाऊसिंग फायनान्स यांच्या सी एस आर फंडातून तसेच साद फाउंडेशन यांच्या माध्यमातून चिंचणी येथील 54 एकर गायरान जमिनीवर वृक्षारोपण करण्याबाबत सर्व कागदपत्रांची पुर्तता आम्ही केलेली आहे. अनिल पवार यांनी बारा दिवसांपुर्वी 50 टक्के जागेत झाडे लावण्याबाबत निवेदन दिलेले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

8 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

8 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

12 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

12 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

12 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

12 तास ago