क्राईम

वाघोलीत लग्नसमारंभादरम्यान नवरीसोबतच झालं मोठं कांड…

शिरूर : वाघोलीतील एका प्रसिद्ध बँक्वेट हॉलमध्ये १४ मे रोजी अक्षता पडण्याची वेळ जवळ येत असल्याने नवरी मुलगी मेकअप रूममध्ये लग्नासाठी तयार होत होती. अक्षता पडल्या, विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. पण, ऐन लग्नाच्या दिवशी गर्दीचा फायदा उठवून तीन संशयित महिलांनी नवरीच्याच खोलीत शिरून एक भयंकर कांड घडवून आणले होते. ज्यामुळे नवरीच्या आनंदाचे रूपांतर क्षणात अश्रूंमध्ये झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व धक्कादायक प्रकार वाघोली येथील ‘श्रेयस बँक्वेट हॉल’मध्ये घडला आहे. लग्नाची गडबड सुरू असताना दोन अल्पवयीन मुलींसह तीन संशयित महिला पाहुण्यांच्या गर्दीत मिसळल्या. कोणालाही संशय येणार नाही अशा बेताने त्यांनी थेट वधूच्या खोलीत प्रवेश केला. खोलीत कोणीही नसल्याचे आणि सगळे लग्नात व्यस्त असल्याची संधी साधून त्यांनी वधूच्या पर्समध्ये ठेवलेले सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने शिताफीने लंपास केले आणि तिथून पळ काढला.

लग्नाचा सोहळा आटोपल्यानंतर दागिन्यांची चोरी झाल्याचे वधूच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले. चोरीच्या या घटनेमुळे लग्नघरातील आनंद क्षणात चिंतेत बदलला. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

पोलीसांनी या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलींसह तीन संशयित महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लग्नघरातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाघोली पोलीस या ‘लेडीज गँग’चा कसून शोध घेत आहेत.

शिरुर तालुक्यात उच्चशिक्षित नवरीची ताशांच्या गजरात घोड्यावरुन आगळी वेगळी मिरवणुक

शिरुर तालुक्यात लग्नाच्या मध्यरात्रीच दागिन्यांसह नवरीने ठोकली धूम…

Video: नवरीने घातला हार अन् नवरदेवाची उतरली पॅन्ट…

शिरूर तालुक्यातून नवरीने लग्नानंतर ठोकली धूम…

Video: नवरा बसला बोलत अन् प्रियकराने पळवले नवरीला…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

9 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

9 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

13 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

13 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

13 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

13 तास ago