मुख्य बातम्या

पिंपरी दुमाला येथे अज्ञात चोरट्यांकडून दहा शेतकऱ्यांची तांब्याची केबल व मोटारची चोरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पिंपरी दुमाला गावच्या हद्दीत मधील शेतातील विहिरीवर बसविलेली पाणी ओढायची ५ एचपी क्षमतेची किर्लोस्कर कंपनीची मोटार तसेच तब्बल १ हजार ८० फुट तांब्याची वायर किंमत अंदाजे ३९ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे.

फिर्यादी श्रीकृष्ण विष्णु सोनवणे (रा. पिंपरी दुमाला, ता शिरुर, जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार, दि १ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी मोटार बंद करुन घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मोटार सुरु करण्यासाठी शेतात गेले असता ही चोरी उघडकीस आली आहे. याच कालावधीत गावातील अनेक शेतकऱ्यांच्या तांब्याच्या केबलची चोरी झालेली आहे.

केबलची चोरी झालेले शेतकरी खालीलप्रमाणे

१) चंद्रकांत सोनवणे (६० फुट केबल)

२) दादाभाऊ सोनवणे (४० फुट केबल)

३) आदित्य चिखले (९० फुट केबल)

४) तेजस चिखले (९० फुट केबल)

५) रावसाहेब सोनवणे (२००फुट केबल)

६) प्रकाश चिखले (१०० फुट केबल)

७) अशोक थोरात (१००फुट केबल)

८) विजया पाटील (५० फुट केबल)

९) नारायण पिंगळे (१००फुट केबल)

या सर्व शेतकऱ्यांच्या तांब्याच्या केबल मागील महिन्यात चोरीस गेल्या आहेत. या सर्व चोरीमुळे गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन या घटनेचा पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप जगदाळे हे करत आहेत.

चिंचणी येथील आबा धावडे यांची भाजपच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

21 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

21 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

21 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago