महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय, ओबीसी समाजासाठीही उप समितीची स्थापना, आजच GR निघणार

मुंबई: मराठा आरक्षण उपसमिती पाठोपाठ आता ओबीसी समाजासाठीही उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या जीआरनंतर राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला होता. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू कऱण्यात आली होती. छगन भुजबळ, बबनराव तायवाडे, हाके, परिनय फुके यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात आली आहेत. त्याचाच भाग म्हणून सरकारकडून उपसमितीची स्थापना करण्यात येत आहे.

मराठा आरक्षणासाठीच्या मागण्या मान्य केल्यानंतर राज्यभरातील ओबीसी समाजाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. ओबीसीचे आरक्षण संपल्याची भावना हाकेंकडून व्यक्त करण्यात आली होती. तर आम्हाला वाटेकरू नको आहेत, आम्ही कोर्टात जाणार आहे, अशी थेट भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली होती. मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यानंतर भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाणेही टाळलं होतं. ओबीसीकडून राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. ओबीसीचा हा रोष पाहता राज्य सरकारकडून उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असा शब्द दिला होता.

ओबीसीच्या समाच्या नाराजीनंतर फडणवीस सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. ओबीसीची नाराजी दूर करण्यासाठी थेट उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. मंत्रि गुलाबराव पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या समितीमध्ये अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे प्रत्येकी दोन दोन मंत्री असतील, अशी माहिती समोर आली आहे. ओबीसी समाजाच्या उपसमितीचा आजच शासन निर्णय निघणार आहे. उपसमितीची नेमणूक आजपासूनच होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

22 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

22 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

23 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago