मुख्य बातम्या

शिरुर पंचायत समितीच्या उपसभापतींच्या पतीसह तिघांवर गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): गणेगाव खालसा (ता. शिरुर) येथील 2 महिलांच्या जमिनीतील मुरुमाची महिलेच्या परस्पर विक्री केल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे शिरुर पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड यांचे पती उद्योजक प्रमोद पऱ्हाड, महेंद्र पऱ्हाड, हेमंत ढमढेरे, प्रवीण दंडवते यांच्या विरुद्ध मुरूम चोरी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे

गणेगाव खालसा (ता. शिरुर) येथे राजश्री मोरे व नंदाबाई साळवे यांची जमीन गट असून २०२० मध्ये सदर जमिनीत मुरुम उत्खनन केल्या प्रकरणी शिरुर तहसील कार्यालय येथे नोटीस लावत राजश्री मोरे व नंदाबाई साळवे यांना सहा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये दंड का आकारण्यात येऊ नये असे नोटीस लावले होते. त्यामुळे राजश्री मोरे यांनी त्याबाबत त्यांचे म्हणणे तहसीलदार यांच्याकडे मांडत या जागेतील मुरुम हा प्रमोद पऱ्हाड, महेंद्र पऱ्हाड, हेमंत ढमढेरे, प्रवीण दंडवते यांनी उत्खनन केला असल्याचे सांगितले होते.

त्यानंतर तहसीलदार यांनी सदर जागेतील मुरुम उत्खनन बाबत राजश्री मोरे व नंदाबाई साळवे यांना 26 लाख 72 हजार रुपये दंड भरण्याबाबतचे आदेश दिले असता राजश्री मोरे यांनी त्याविरोधात महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई यांच्याकडे अर्ज दिला असता सदर आयोगाने त्याबाबतचा अहवाल तहसीलदार यांच्याकडून घेत घडलेल्या प्रकारात अहवालानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

याबाबत राजश्री अंकुश मोरे (वय ४2) रा. न्हावरा रा. शिरुर जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने पोलिसांनी शिरुर पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड यांचे पती उद्योजक प्रमोद पऱ्हाड, महेंद्र पऱ्हाड दोघे रा. केंदूर (ता. शिरुर) जि. पुणे, हेमंत ढमढेरे रा. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे सध्या रा. खराडी बायपास चंदननगर पुणे व प्रवीण दंडवते रा. गणेगाव खालसा (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे हे करत आहे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मुंबई: आजचा दिवस अनेक राशींसाठी नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे.…

3 मिनिटे ago

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

11 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

11 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

15 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

15 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

15 तास ago