न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात गुरवार (दि 26) मध्यरात्रीच्या सुमारास किराणा दुकान फोडून चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नितीन येळे यांच्या कोकरे किराणा स्टोअर या दुकानाचे छतावरील पत्रे उचकटून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आणि रोकड लंपास करून पसार झाला. संपूर्ण प्रकार दुकानातील सिसीटिव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या चोरट्याने दुकानाच्या मागील बाजूने छतावरील पत्रे काढून आत प्रवेश केला. दुकानातील रोकड पेटीतील रक्कम चोरून तो अंधाराचा फायदा घेत पसार झाला. सकाळी दुकान उघडताना हा प्रकार उघडकीस आला. छतावरील पत्रे विस्कटलेली आणि दुकानातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आले.
दुकानात बसविण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात चोरट्याची हालचाल स्पष्टपणे दिसत आहे. चेहरा आंशिक झाकलेला असला तरी त्याची अंगकाठी, हालचाली आणि कपडे यावरून ओळख पटविण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन न्हावरे परिसरात यापुर्वीही लहान-मोठ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी “रात्री गस्त वाढवावी, संशयितांवर कारवाई करावी,” अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह…?
मध्यरात्रीच्या सुमारास इतक्या शांतपणे छत फोडून चोरी होते आणि पोलिसांना खबरही लागत नाही, यावरुन पोलिस गस्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वारंवार होत असलेल्या घटनांमुळे प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अन्यथा व्यापाऱ्यांचा संयम सुटू शकतो, असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे. फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. न्हावरेकरांचे आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…
रांजणगाव गणपती : निर्मलग्राम ग्रामपंचायत रांजणगाव गणपती यांच्या वतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बबन खेडकर…
मुंबई राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारेच करणे बंधनकारक आहे. मंजूर…
मुंबई : महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६ च्या मसुद्यावर राज्यभरातून मोठ्या…
ठाणे : गणेशोत्सव केवळ देखावे, आरास आणि रोषणाईपुरता मर्यादित न राहता त्यातून समाजप्रबोधन, जनजागृती आणि सामाजिक…