शिरूर तालुका

वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न!

वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिका माता यात्रा उत्सव दोन दिवस मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी (ता. २४) ग्रामपंचायत प्रशासन यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने भव्य पालखी मिरवणूक, काठीची मिरवणूक काढून देवीला साडीचोळी अर्पण केली. सायंकाळी विठाबाई भाऊ (मांग) नारायणगांवकर यांचा लोकनाट्य तमाशाचा नागरिकांसह पै-पाहुण्यांनी आनंद लुटला.

बुधवारी (ता. ८) सकाळी तमाशाचा हजेरीचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यासह विविध ठिकाणांहून आलेल्या पहिलवानांनी सहभाग नोंदवला. आनंदराव सोनवणे, राजेंद्र भोसले, सुहास काटे यांनी पहिलवानांच्या कुस्त्या लावल्या. कुस्त्यांचा आखाडा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी ‘एकापेक्षा एक’ या मराठी व हिंदी गाण्यांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. आर्केस्ट्रालाही मोठा प्रतिसाद मिळाला.

वाघाळे गावामध्ये यात्रेनिमित्त अनेक हॉटेलधारकांनी दुकाने थाटली होती. लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळ उपलब्ध झाले होते. महिलांनी खरेदीचा आनंद लुटला. दोन दिवस मोठ्या उत्साहात यात्रा पार पडली. रांजणगाव एमआयडीसीच्या पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

वाघाळे गावची यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत वाघाळे, कालिका माता यात्रा कमिटी वाघाळे यांचे योगदान लाभले. यावेळी लहुशेठ थोरात, संचालक खरेदी-विक्री संघ शिरूर, राजेंद्र भोसले अध्यक्ष कुस्तीगीर संघ शिरूर, उपसरपंच राजेंद्र धायबर, सुहास काटे अध्यक्ष शेतकरी संघटना, दिलीप थोरात मा. चेअरमन, आनंदराव सोनवणे मा. चेरमन, अमोल धरणे मा. सरपंच, जयेंद्रकुमार सोनवणे, वैभव गावडे उदयोजक, ओंकार थोरात अध्यक्ष कलासागर प्रतिष्ठाण, गौतम कारकूड मुंबई पोलीस, अशोक शेळके पुणे पोलिस, दिलीप थोरात (गुरुजी), सामाजिक कार्यकर्ते संदीप धायबर, किसनराव गोरडे, शरद धायबर, संतोष गोरडे, गजानन थोरात, बाळासाहेब शेळके, विशाल शेळके, अमित सोनवणे, दिगंबर बढे, संदीप शेळके, वाल्मिक गावडे, बाळासाहेब सोनवणे, अशोक कारकूड, पप्पू पवार, नानासाहेब थोरात, श्री जय जवान संघाचे सदस्य यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

वाघाळे गावच्या उपसरपंचपदी राजेंद्र धायबर यांची बिनविरोध निवड

Video: वाघाळे गावात बिबट्याने पोल्ट्री फार्ममधून पाळीव कुत्रा नेला उचलून…

Video: वाघाळे येथे ग्रामस्थांचा वाढदिवस एकत्रित साजरा…

वाघाळे येथून वाघेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान…

वाघाळे येथे 24 वर्षानंतर माजी विद्यार्थी आले एकत्र!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

3 तास ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

5 तास ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

5 तास ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

5 तास ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

21 तास ago

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

2 दिवस ago