मुख्य बातम्या

दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सर्वात तरुण सरपंचाचा सन्मान

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील म्हसे बुद्रुक गाव स्वतंत्र झाल्यानंतर गावच्या प्रथम सरपंचपदी २१ वर्षीय युवक सौरभ पाटीलबुवा पवार याची तर उपसरपंचपदी प्रियंका जालिंदर खाडे यांची निवड झाली आहे. म्हसे बुद्रुक ग्रामपंचायत स्वतंत्र झाल्यानंतर पहिलीच निवडणूक पार पडली. निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून तरुणांनी आग्रह धरला. परंतु काही मातब्बर राजकारणी लोकांनी सरपंचपदासाठी आग्रह धरल्याने गावावर निवडणूक लादली गेली.

ranjangaon-mutadwar-darshan

ग्रामपंचायत विभाजन करण्यात महत्वाची भूमिका असणारे काळूराम उर्फ पाटीलबुवा पवार यांचेच नाव मतदार यादीतून वगळले गेले. परंतु तरीही त्यांनी पॅनल टाकला, त्यांचा मुलगा सौरभ हा निवडणुकीला सामोरा गेला आणि जनतेनेही त्यांच्याच बाजूने कौल दिला. त्यांच्या पॅनलला ५-२ असे स्पष्ट बहुमत मिळाल्याने सौरभ पवार या २१ वर्षीय तरुणाची प्रथम सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. बेट भागातील सर्वात तरुण सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून गावकारभारासाठी जनतेने तरुणांना पसंती दिल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

निवडून आलेले सदस्य … सौरभ पाटीलबुवा पवार (सरपंच), प्रियंका जालिंदर खाडे (उपसरपंच), जालिंदर संता मुसळे, मंगल जयवंत मुसळे, निलेश पोपट नरसाळे, दामिनी हनुमंत मुसळे, मंदा सदाशिव वेताळ

या सर्व नवनिर्वाचित सरपंच , उपसरपंच आणि सदस्यांचे टाकळी हाजी चे माजी सरपंच दामुशेठ घोडे,सरपंच अरुणा घोडे, सेवानिवृत्त सी ई ओ प्रभाकर गावडे,सोसायटीचे अध्यक्ष बन्सी घोडे यांनी अभिनंदन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

4 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

5 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

5 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

19 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago