शिरुर (अरुणकुमार मोटे) मलठण (ता. शिरुर) येथील शिंदेवाडी येथे आज रविवार (दि.२८) खंडोबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यती सुरु असताना बैलगाडा घाटातच स्थानिक नागरिकांमध्ये अचानक वादावादी झाल्याने शर्यती बंद करण्यात आल्या. या भांडणाचा बैलगाडा शर्यतीशी कुठलाही संबंध नसल्याचे यात्रा कमिटीकडून सांगण्यात आले.
शिंदेवाडी येथील स्थानिक दोन कुटुंबात ही वादावादी झाली असुन भांडणाचे कारण उशीरापर्यंत समजू शकले नाही. संजय रखमा शिंदे (वय अंदाजे ३५) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर शिरुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत,अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
सध्या गावोगावी यात्रा सुरु असुन बैलगाडा शर्यत हे यात्रेचे मुख्य आकर्षण बनले आहे. शर्यती सुरु झाल्यापासून बैलगाडा प्रेमी प्रत्येक यात्रेतील शर्यतीत सहभाग नोंदवत आहेत. मात्र अशा प्रकारे तंटे झाल्यास यात्रा बंद होवू शकते अशी भीती व्यक्त होत आहे. संवेदनशील गावांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवावा लागेल तरच शर्यती व्यवस्थित पार पडतील अशी अपेक्षा बैलगाडा मालकांकडून व्यक्त होत आहे.
शिक्रापुर येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पवयीन युवतीचा विनयभंग
तळेगाव-न्हावरे रोडवर नियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटली; दोघे जण गंभीर जखमी
करडे परीसरात मध्यरात्री जाळला जातोय क्रॅप मधील अनावश्यक कचरा
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…