Mahaganpati
रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) अष्टविनाकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव येथील महागणपतीची दरवर्षीप्रमाणे भाद्रपद द्वारयात्रेला उद्या (दि ४) सप्टेंबर पासुन सुरुवात होणार आहे. या यात्रेसाठी देवस्थानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येत आहे. या द्वारयात्रेसाठी राज्यातून तसेच देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात.
नवसाला पावणारा गणपती म्हणजेच श्री क्षेत्र रांजणगावचा महागणपती अशी भाविकांची श्रद्धा आहे. अष्टविनाकांपैकी एक असलेल्या रांजणगाव येथील महागणपतीच्या द्वार यात्रेचा उत्सव उद्या बुधवार दि ४ सप्टेंबर २०२४ ते मंगळवार १० सप्टेंबर २०२४ रोजी समाप्त होणार आहे. या यात्रेदरम्यान महागणपतीच्या मुर्तीची पालखी चार दिवसांत गणपतीच्या बहिणींना आणण्यासाठी देवाची पालखी जात असते.
पहिल्या दिवशी पुर्वद्वारकडे असलेल्या करडे गावातील मांजराई देवीकडे पालखीचे प्रस्थान होत असते. पहिल्या दिवशी पालखीचे मानकरी हे पाचुंदकर आळी हे असतात. दुसऱ्या दिवशी दक्षिण द्वार असलेल्या निमगाव म्हाळुंगी येथील आसराई (शिरसाई) देवीकडे पालखीचे प्रस्थान होते. यावेळी पालखीचे मानकरी माळी आळी हे असतात. तर तिसऱ्या दिवशी पश्चिम द्वार असलेल्या गणेगाव खालसा येथील ओझराई देवीकडे पालखीचे प्रस्थान होते. यावेळी पालखीचे मानकरी लांडे आळी हे असतात. तर चौथ्या दिवशी उत्तरद्वार असलेल्या ढोक सांगवी येथील मुक्ताई देवीकडे पालखीचे प्रस्थान होत असते. यादिवशी पालखीचा मान शेळके आळी यांचा असतो.
या चार दिवसांत महागणपीच्या मुर्तीस स्पर्श करुन भाविकांना दर्शन घेता येत असते. त्यानंतर रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने इतर दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोई सुविधा देखील उपलब्ध करण्यात आल्या असुन यात महिलांसाठी विशेष हिरकणी कक्ष उभारण्यात आलेले आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा देखील फौज फाटा उभारण्यात येणार आहे. यात देवस्थान ट्रस्ट, महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आणि प्रशासन सज्ज झालेले आहे.
द्वार यात्रा काळात भाविकांनी मोठ्या संख्येने महागणपतीच्या दर्शनासाठी यावे असे आवाहन देखील देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच देशभरातून येणाऱ्या भाविकांची योग्यरित्या सोई सुविधा उपलब्ध केल्याचे देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ओमकार देव तसेच अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी माहिती दिली आहे.
रांजणगाव गणपती येथे बापुसाहेब शिंदे यांच्या प्रयत्नातुन बसवला अवघ्या २४ तासात बसवला ट्रांन्सफार्मर
श्री क्षेत्र रांजणगाव गणपती ट्रस्ट तर्फे कर्मचारी महिलांच्या हस्ते आरती करुन महिलादिन साजरा
रांजणगाव गणपती येथे महागणपती गणपती मंदिरात उद्या सामूहिक अथर्वशीर्ष पठण
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…