रांजणगाव गणपती येथे बापुसाहेब शिंदे यांच्या प्रयत्नातुन बसवला अवघ्या २४ तासात बसवला ट्रांन्सफार्मर

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील मैंद नगर येथील १०० केव्हीचा ट्रांन्सफार्मर जळाल्याने नागरिकांची गैरसोय होण्यापुर्वीच शिवसेनेचे युवा सेना पुणे जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे यांच्या प्रयत्नातून अवघ्या २४ तासात जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी दुसरा ट्रांन्सफार्मर बसविण्यात आला.

रांजणगाव गणपती येथील वार्ड क्रं ६ मधील ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे तेथील व्यावसायिकांचे तसेच भाडेकरुंचे नुकसान होऊ नये. तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवण्याआधी याचे गांभीर्य लक्षात घेऊन वार्ड क्रं ६ मधुन निवडुन आलेल्या ग्रामपंचायत सदस्या अर्चना शिंदे तसेच त्यांचे पती बापुसाहेब शिंदे यांनी महावितरणचे सहायक अभियंता दिपक पाचुंदकर यांच्याशी संपर्क साधत तातडीने ट्रांन्सफार्मर उपलब्ध करुन देण्याची विनंती केली.

 

वार्ड क्रं ६ मधील ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्या अर्चना शिंदे यांच्याकडे अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे अवघ्या २४ तासात दुसरा ट्रांन्सफार्मर बसविण्यात आला असल्याने व्यावसायिक आणि भाडेकरु यांनी आनंद व्यक्त करत शिंदे दांपत्य यांच्यासह महावितरणच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

 

शिरुर तालुक्यातील पारोडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

शिरुर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकपदी संदेश केंजळे यांची नियुक्ती; ज्योतिराम गुंजवटे यांची मुख्यालयात बदली

शिरुर पोलीस स्टेशनला सिंघम अधिकाऱ्यांची गरज…? गेल्या वर्षेभरात गुन्हेगारीचा आलेख उंचावला