मुख्य बातम्या

शिरुर शहरातुन दोन महिला बेपत्ता; पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात मुली व महीला गायब होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. ओम रुद्र रेसिडेन्सी, रामलिंग रोड येथिल गौरी प्रीतम जाधव (वय १९) हि महिला घरातुन कोणाला काही न सांगता निघुन गेली आहे. तसेच रामलिंग रोड, अरुणराव नगर येथुन सोनल रोहिदास खोल्लम (वय ३६) ही महीला राहत्या घरातुन मोबाईलच्या दुकानात जावुन येते असे सांगुन मुलगी श्रावणी खोल्लम (वय २) हिला शाळेतुन सोबत घेवुन गेली ती अदयाप आली नाही. या दोन्ही घटनासंदर्भात शिरुर पोलिस स्टेशनमध्ये मिसिंगची फिर्याद दाखल झाली आहे.

 

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे (दि २९) ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास यातील मिसिंग व्यक्ती गौरी प्रीतम जाधव ही घरातुन कोणास काही एक न सांगता घरातून निघुन गेलेली आहे. बेपत्ता महिलेचे वर्णन उंची ५ फुट, रंग काळा सावळा, नाक सरळ, चेहरा गोल, अंगाने सडपातळ, केस काळे व लांब, हातात हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या, पायात जांभळ्या रंगाची चप्पल, सोबत सॅमसंग कंपनीचा नोट-७ मोबाईल, गळ्यात मनी मंगळसुत्र

 

दुसऱ्या घटनेमध्ये सोनल रोहिदास खोल्लम ही (दि २) सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास राहत्या घरातुन मोबाईलच्या दुकानात जावुन येते असे सांगुन मुलीला शाळेतुन सोबत घेवुन गेली. ती अद्यापपर्यंत घरी आली नाही.तिचा रंग गोरा, उंची ५ फुट, अंगाने मध्यम, केस लांब सरळ, डावे हातचे मनागटावर इंग्रजीमध्ये रोहीदास नाव व मराठीत ओम, अंगठ्यावर तीन स्टार व उजव्या हातावर श्रावणी नाव अस गोंधलेले, नेसणीस गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, तिच्या सोबत मुलगी श्रावणी खोल्लम (वय २ ) अंगात लाल रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट शाळेचा ड्रेस या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलिस करत आहेत.

शिरुर संवादिनी तर्फे डेक्कन एज्युकेशन सोसायटी शाळेत ओळख स्पर्शाची हा स्तुत्य उपक्रम

शिरुर ST बस स्थानकातील अस्वच्छ शौचालयाबाबत रामलिंग महिला उन्नतीचे निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषण

मांडवगण फराटा येथील श्री वाघेश्वर विद्याधाम योगासन स्पर्धेत घवघवीत यश

मांडवगण फराटा इथं किरकोळ कारणावरुन जेष्ठ महिलेला शिवीगाळ व मारहाण करत दिली जिवे मारण्याची धमकी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

10 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

10 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

11 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago