शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथे थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करुन उच्चदाबाच्या रोहित्राला थेट केबल जोडून होणाऱ्या वीजचोरीचा महावितरणने ऑगस्ट-२०२३ मध्ये ड्रोनच्या सहाय्याने पर्दाफाश केला होता. याबाबत महावितरणतर्फे केडगाव पोलिसांत मुकेश अगरवाल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत वीजपुरवठा बंद केला. त्यानंतर प्रकरण कोर्टात गेल्याने जिल्हा सत्र न्यायालयाने वीजचोरीच्या दंडातील ७५ टक्के म्हणजेच १ कोटी १५ लाख रुपये रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत करता येणार नसल्याचा आदेश नुकताच दिला असुन या आदेशाने वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.
सणसवाडी (ता. शिरुर) येथे श्री. मुकेश ओमप्रकाश अगरवाल (रा. अग्रसेन सोसायटी, कोरेगाव पार्क, पुणे) यांच्या मालकीच्या तीन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. त्यापैकी थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा.लि आणि प्रकाश करुगेटेडे पुणे प्रा.लि ह्या दोन उच्चदाबाचे तर भगवान ट्यूब प्रा.लि. हे लघुदाब ग्राहक आहेत. तिन्ही कंपन्या एकाच आवारात व शेजारी-शेजारी आहेत. थकबाकीमुळे एका कंपनीचा कायमस्वरुपी तर दोन कंपन्यांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद केलेला असताना संबंधित ग्राहकाने मीटरला बायपास करुन थेट रोहित्रातून वीजचोरी केली. महावितरणला याची कुणकुण लागताच 25 ऑगस्ट 2023 रोजी ही वीजचोरी महावितरणने मोठ्या शिताफीने उघडकीस आणली. त्यासाठी ड्रोनचीही मदत घेतली.
तीन पैकी दोन वीज जोडण्यांचा वीजपुरवठा सुरु करुन मिळावा म्हणून ग्राहकाने जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली होती. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार वीजचोरी रकमेच्या ७५ टक्के रक्कम ग्राहकाला भरावयाची आहे. त्याशिवाय वीजपुरवठा जोडून मिळणार नसल्याने वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत. महावितरणतर्फे ॲड.सचिन खंडागळे व ॲड. गणेश डिंबळे यांनी बाजू मांडली.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…