शिरूर तालुका

अमेरिकेचे अध्यक्ष, मलाला युसूफझईंसह जगप्रसिद्ध व्यक्ती मध्ये माहेरच्या लुसी कुरियन…

जगातील प्रेरणादायी मनुष्यात माहेर संस्थेच्या संस्थापिका सि.लुसी कुरियन यांची ३० व्या स्थानी निवड

शिरूर (तेजस फडके): वढु बुद्रुक (ता.शिरूर) येथील समाजसेविका व माहेर संथेच्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरियन यांच्या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ओर्फ़ विनफ्र, मलाला युसूफझई या जगप्रसिद्ध व्यक्ती मध्ये माहेरच्या लुसी कुरियन यांचा समावेश करण्यात आला आहे.

वढू बुद्रुक गावाचे व माहेर संस्थेचे नाव जागतिक स्तरावर विक्रमी नोंदविण्यात आले आहे. 000M 100 या जर्मन मासिकाने जगातील सर्वात प्रेरणादायी मनुष्यात 2024 च्या निवडीमध्ये माहेर संस्थेच्या संस्थापिका सि.लुसी कुरियन यांची ३०व्या स्थानी निवड झाली आहे.

जर्मनी मधील जागतिक कीर्तीचे मासिक असलेल्या 000M १०० मध्ये भारतातील सि. लुसी कुरियन यांच्या सह गांधीवादी कार्यकर्ते निपुण शहा यांची निवड तर आंतरराष्टीय पातळीवर मिशेल ओबमा, आर्नोल्ड श्वझनेगर, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ओर्फ़ विनफ्र, मलाला युसूफझई जगप्रसिद्ध व्यक्ती मध्ये निवड झाली.
मासिकाने म्हटल्या प्रमाणे सध्याचे जग हे उलटे क्रमानुसार चालू आहे का असा प्रश्न पडतो कारण याला कारणे ही तशीच आहेत. यामध्ये इस्रायल आणि युक्रेनमधील युद्धे अविश्वासाने पाहतो, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोखमींबद्दल काळजी करतो, राजकारण आणि अब्जावधी दिवाळखोरी पाहून आश्चर्यचकित होतो.पण यासोबत सौंदर्य, कला, संगीत, सामाजिक जीवन, जीवनाचा आनंद सह अनेक बाबीचा विचार करुन गेल्या ८ वर्षा पासून आव्हानात्मक काळात ज्या लोकांनी सर्वात जास्त प्रेरणा दिली, प्रेरित केले, आनंदित केले आणि उत्साहित केले आहे याची OOOM मासिकाने आठव्यांदा मोठा रँकिंग “OOOM 100 यांनी लोकांची निवड यादी तयार केली आहे.

सिस्टर लुसी कुरियन यांनी समाजातील अनाथ, निराधार मुले, महिला व पुरुषाचे पुर्नवसनाचे काम गेल्या २७ वर्षा पासून करीत आहेत. भारतातील ७ राज्यात, महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यात तर पुणे जिल्यातील ८ ठिकाणी संस्था विविध प्रकल्पाच्या माध्यमातून समाज विकासाचे कार्य सि.लुसी कुरियन यांच्या मार्गदर्शना खाली चालू आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून विविध स्तरातून त्यांना वेगवेगळी पुरस्कार मिळाले आहे. सदर मासिक हे गेल्या काही वर्षांपासून सि.लुसी कुरियन यांना वेगवेगळी मानांकन देत आहे. यामुळे सध्या माहेर परिवारात खुप उत्साहाचे वातावरण असून, बालगोपाल, महिला, पुरुष तसेच कर्मचारीवृंद यांच्या चेहऱ्या आंनद ओसंडून वाहत आहे.

माहेर संस्था व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा

माहेर संस्थेकडून महिला दिनी पत्रकार पत्नींचा सन्मान

माहेर संस्थेत तीन विशेष दाम्पत्यांचे विवाह थाटात संपन्न…

माहेर संस्थेच्या वतीने दिव्यांग स्नेह मेळावा संपन्न

माहेर संस्थेला मिळाला १८८ वा जावई

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…

3 तास ago

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

17 तास ago

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

18 तास ago

शीतपित्त म्हणजे काय

शीतपित्ताच्या त्रासात अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या…

18 तास ago

भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीचा भाजपाने घेतला धसका; मोदी-शाहांच्या सत्तेला हादरे बसत असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा…

18 तास ago

अमित शाहांच्या भेटीवरून राष्ट्रवादीतील मतभेदांच्या चर्चेला उमेश पाटील यांचा खुलासा

सुनेत्रा पवारांना डावलल्याच्या बातम्या फेटाळल्या! मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील समन्वयाच्या चर्चांना…

18 तास ago