मुख्य बातम्या

पिंपरखेड येथे जबरी चोरी; लाखोंचा ऐवज लंपास नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील पिंपरखेड (पंचतळे) येथे संतोष कारभारी जाधव यांच्या घरावर मध्यरात्री तीनच्या सुमारास जबरी चोरी करत सुमारे आठ तोळे सोने, मोबाईल, टायटन कंपनीचे घड्याळ व पंधरा हजार रूपये रक्कम असा अंदाजे एकूण ३ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज लंपास करून चोरट्यांनी पोबारा केला. याबाबत रेश्मा संतोष जाधव यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच शिरूरचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले, पोलिस हवालदार अमोल आगलावे यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरखेड हद्दीतील पंचतळे नजीक रेश्मा संतोष जाधव ह्या आपले सासू, सासरे, पती व मुलासह वास्तव्यास आहेत. आदल्या दिवशी (दि.१९) रोजी रेश्मा यांची सासू व सासरे हे दशक्रियेनिमित्त बाहेरगावी गेले असताना शुक्रवार (दि.२०) रोजी पहाटे तीनच्या सुमारास अंगात निळसर जर्किंग, जीन्स पॅन्ट, काळ्या रंगाचे स्पोर्ट्सचे शूज, तोंडाला व डोक्याला मफलर असा पेहराव असणाऱ्या चार अज्ञात इसमांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी तुमच्याकडे असलेले सर्व पैसे द्या, कपाटाच्या चाव्या कुठेत अशा प्रकारे धमकी देत हातातील विळ्यासारख्या दिसणाऱ्या हत्याराचा धाक दाखवत अंगावरील सर्व दागिने काढून देण्यास सांगितले. दरम्यान घाबरलेल्या अवस्थेतील रेश्मा यांनी आपल्या अंगावरील सर्व दागिने काढून दिले. तसेच चोरट्यांनी आपल्या हातातील कटावणीच्या साह्याने कपाटाचे लॉकर तोडून इतर काही दागिने जबरीने काढून घेतले.

यामध्ये गळ्यातील व कानातील गळसर, सोन्याचा नेकलेस, मंगळसूत्र, कानातील रिंग या स्वरूपाचे सोन्याचे दागिने, मोबाईल, टायटन कंपनीचे घड्याळ, घरामागील गोठ्यात बांधलेली काळ्या रंगाची शेळी व पंधरा हजार रूपये रक्कम असा एकूण ३ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेत दुसऱ्या खोलीत ठेवलेल्या लोखंडाची पेटीसह इतर साहित्याची उचकापाचक करून घराजवळील शेतात पेटीतील साहित्य फेकून दिले. तसेच घराला बाहेरून कडी लावून जाधव कुटुंबियांना घरामध्ये कोंडून घेत मोबाईल चोरून नेल्याने शेजारी इतरत्र कोणाशीही संपर्क करता आला नाही.

दरम्यान घटनास्थळाला शिरुरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहाय्यक फौजदार तुषार पंधारे, पोलिस हवालदार जनार्दन शेळके यांनी भेट दिली आहे. तसेच या घटनेतील जबरी चोरी करणाऱ्या इसमांची ओळख पटण्यासाठी बोटांचे ठसे निर्देशित करणारे पथक पाचारण करण्यात येणार असून नजीकच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास शिरुरचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले करत आहेत.

पंचंतळे येथे पोलिस चौकीची मागणी…

या भागात दरवर्षी अनेक छोट्या मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता बेल्हा-जेजुरी राज्यमार्गावरील पंचतळे हे मध्यावधी ठिकाण असून अनेक रस्ते एकत्र येत असल्याने गुन्हेगारांचा शोध घेणे अवघड होत आहे. यामुळे रात्रीच्या वेळी ग्रामसुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून गस्त घालणे गरजेचे असून पंचतळे ठिकाणी पोलीस चौकी व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

5 मिनिटे ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

10 मिनिटे ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

13 मिनिटे ago

५ हजारांत दिवाळी साजरी करून दाखवा! फडणवीसांना हर्षवर्धन सपकाळांचे खुले आव्हान

महायुती सरकारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा जोरदार हल्लाबोल; ‘गोकुळ’वर कब्जा करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप मुंबई: राज्यातील…

18 मिनिटे ago

राज्याच्या आरोग्य यंत्रणेला मिळणार मोठे बळ! एकाच वेळी १,४४० वैद्यकीय अधिकारी सेवेत दाखल;

मुंबई: महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतिहासात आज ऐतिहासिक नोंद झाली आहे. एकाच वेळी तब्बल १,४४० नवनियुक्त…

22 मिनिटे ago

महामार्ग सुरक्षेच्या लोकशाही लढ्याला कायदेतज्ज्ञांची साथ!

१३ दिवसांच्या आंदोलनानंतर दाखल गुन्ह्यांत न्यायालयीन दिलासा; अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन कायम शिरूर: पुणे-अहिल्यानगर राष्ट्रीय…

27 मिनिटे ago