मुख्य बातम्या

“शिरुर तालुका मल्ल सम्राट” स्पर्धेच्या लोगोचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते अनावरण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील अविनाश संकपाळ व आशिष देशमुख या दोन्ही तरुणांचा आदर्श इतर तरुणांनी घ्यावा” तसेच प्रकारच्या कुस्ती स्पर्धा प्रत्येक तालुक्यात व्हाव्यात. त्यामुळे तळागाळातील मल्लांना चांगली संधी प्राप्त होईल असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. आज (दि 20) रोजी पुणे येथे केंद्रीय सूक्ष्म ,लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते “शिरुर तालुका मल्ल सम्राट स्पर्धा २०२३ आंबळे” या स्पर्धेच्या “लोगो” चे अनावरण करण्यात आले. गेली १९ वर्ष अखंडित पणे सुरु असलेली हि स्पर्धा यंदा २० व्या वर्षात पदार्पण करत आहे. ही स्पर्धा तालुक्यातील मल्लांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करुन देत असते. यंदाच्या वर्षी हि स्पर्धा शिरुर तालुक्यातील आंबळे या ठिकाणी १०,११ व १२ फेब्रुवारी रोजी होणार आहेत.

दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील शिरुर मल्ल सम्राट हा किताब जिंकणाऱ्या मल्लास चांदीची गदा व दुचाकी बुलेट गाडी रोख स्वरुपात बक्षिस म्हणुन देण्यात येणार आहे. तर उपविजेत्या मल्लास दुचाकी स्प्लेंडर गाडी व रोख स्वरुपात बक्षिस देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महिला विभागातील खुल्या गटातील विजेत्या महिलेस दुचाकी स्कुटी गाडी आणि चांदीची गदा व रोख स्वरुपात बक्षिसे देण्यात येणार आहेत.

या लोगोच्या अनावरण प्रसंगी पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे चिटणीस सचिन सातपुते, “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाचे शिरुर तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे, पुणे शहर भाजप वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष देशमुख , स्पर्धेचे आयोजक अविनाश संकपाळ, आंबळे गावचे सरपंच सोमनाथ बेंद्रे, शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष दीपक वाघचौरे, आप्पासाहेब धुमाळ, महेश बेंद्रे, गणेश बेंद्रे, दादासाहेब चव्हाण आणि हर्षद देशमुख उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

54 मिनिटे ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago