मुख्य बातम्या

पिंपरखेडमध्ये ऊस तोडताना आढळले चार बिबट्याचे बछडे

शिरुर (अरुणकुमार मोटे) पिंपरखेड येथे आज बुधवार (दि. २) रोजी बाळासाहेब पांडुरंग दरेकर यांच्या शेतात ऊस तोडणी सुरु होती. ऊस तोडणी सुरु असताना ऊसाच्या सरीमध्ये बिबट्याचे लहान चार बछडे आढळून आले असुन त्यांचे वय अंदाजे दहा दिवस आहे. ऊसतोडणी कामगारांनी शेतमालक व संबंधित कारखान्याचे अधिकारी यांना ही माहिती दिली. याबाबत वनविभागास कळविल्यानंतर वनविभागाचे अधिकारी यांना बछडे सापडल्याची माहिती मिळताच वनपाल गणेश पवार व महेंद्र दाते यांनी ऊसाच्या शेताकडे धाव घेतली.

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे ऊसतोडणी सुरु असताना बिबट्याचे चार बछडे आढळून आल्याने या परिसरात बिबटे असल्याची चर्चा असुन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने शेतकरी दरेकर यांना शेतातील राहिलेली ऊस तोडणी बंद करण्यास सांगितले. सापडलेले बिबट्याचे बछडे या ऊसाच्या शेतातच असून रात्रीच्या वेळी बिबट्याची मादी येऊन या बछड्यांना दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल, असे वनविभागाच्या अधिकारी यांनी सांगितले. पिलांच्या संरक्षणासाठी मादी हल्ला करण्याची शक्यता असल्याने या परिसरातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

१२ वर्षांमध्ये वाढली बिबट्यांची संख्या

बिबट मादी एका वेळी चार बछड्यांना जन्म देत असल्याचा अंदाज लावला जात आहे. बिबट्याची प्रजननक्षमता जास्त असल्याने या परिसरात झपाट्याने बिबट्याची संख्या वाढली आहे. गेले बारा वर्षांपासून या परिसरात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान या परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असून अनेक ठिकाणी बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या असल्याने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी सरपंच राजेंद्र दाभाडे यांनी वनविभागाकडे केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

9 तास ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

9 तास ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

9 तास ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

10 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

10 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

23 तास ago