शिरूर तालुका

घोडगंगा निवडणूकीत पैलवान मंडळी ‘त्यांना’ योग्य जागा दाखवतील: रामभाऊ सासवडे

शिरुर (तेजस फडके): घोडगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष अशोक पवार यांनी पैलवानांचे प्रेरणास्थान असलेल्या आत्माराम फराटे आणि गोविंद फराटे यांच्या बाबत कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत ते दोघे माझ्या अंगावर धावून येत होते. अरे तिथं काय आखाडा आहे का…? असे वक्तव्य करत त्यांच्यासह कुस्तीक्षेत्राला कमी लेखले म्हणून तालुक्यातील पैलवानांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. कुस्तीक्षेत्र पवित्र असून पैलावानांचे आराध्यदैवत श्रीराम भक्त हनुमान यांनी अहंकारी रावणाची लंका दहन केली होती. शिरुर तालुक्यातील या अहंकारी रावणाची लंका पैलवान मंडळी, घोडगंगाचे शेतकरी सभासद आणि सामान्य नागरिक नक्कीच संपवतील, असे मत रामभाऊ सासवडे यांनी व्यक्त केले.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी व सुखासाठी आम्ही घोडगंगा किसन क्रांती पॅनलला पाठिंबा देत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सूचनेनुसार आम्ही घोडगंगा किसान क्रांती पॅनलला बहुमत मिळवून देण्यासाठी शिरुर तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी आणि सभासद प्रयत्न करत असून शेतकऱ्यांची होणारी हेळसांड त्यांची होणारी गळचेपी थांबवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी पाठिंबा जाहीर केला आहे. उसाला प्रतिटन ५०० रुपये बाजारभाव कमी मिळत असून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घोडगंगा किसान क्रांतीला जाहीर पाठिंबा दिला आहे, असे बाळासाहेबांची शिवसेनेचे शिरुर तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे यांनी सांगितले.

शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असणारा आणित्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणारा घोडगंगा सहकारी साखर कारखाना वाचला, तर शेतकरी वाचेल. तसेच तालुक्यातील सहकार क्षेत्र वाचेल. त्यासाठी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता शेतकरी वाचला पाहिजे त्याचे आर्थिक हित साधले पाहिजे या भूमिकेतून आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी घोडगंगा किसन क्रांती ला पाठिंबा देत असल्याचे यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शिरूर तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने “घोडगंगा किसन क्रांती पॅनल” ला पाठिंबा देऊन आम्ही सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी मदत करु तसेच आगामी काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती ,बाजार समिती या निवडणुकांमध्ये भाजपा बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणार असुन त्यामुळे निश्चितच यश मिळेल असे मत बाळासाहेबांची शिवसेनाचे
उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद यांनी व्यक्त केले.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पुणे उपजिल्हा प्रमुख अनिल काशीद, शिरूर तालुका अध्यक्ष रामभाऊ सासवडे, पुणे भाजपा सरचिटणीस रघुनंदन गवारे, जिल्हा सल्लागार रोहिदास शिवले, जिल्हा समन्वयक आनंदराव हजारे, जिल्हा संघटक युवराज निंबाळकर, तालुका संघटक दत्तात्रय गिलबिले, उपतालुका प्रमुख शरद नवले, गणेश कोतवाल, संतोष वर्पे, सागर दरेकर,कारेगावचे ग्रामपंचायत सदस्य तेजस नवले, भारत नवले, कारेगाव शाखा प्रमुख विकास नवले, उपविभाग प्रमुख अभिजित गवारे, दशरथ नागवडे, गोरक्ष पवार, उपतालुका प्रमुख संजय पवार, मच्छिंद्र कदम, दत्तात्रय वाजे आदी उपस्थित होते.

घोडगंगाच्या कामगारांचे हक्काचे पैसे द्या, त्यांचा तळतळाट घेऊ नका: सुधीर फराटे

आमच्यावर टिका करता तर तुम्ही स्वतःला आणि मुलाला उमेदवारी का घेतली?: दादा पाटील फराटे

Video: घोडगंगा साखर कारखाना अशोक पवार यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही: महेश ढमढेरे

घोडगंगात भ्रष्टाचार करुन अशोक पवारांनी व्यंकटेश उभारला: अ‍ॅड सुरेश पलांडे

Video: आम्ही चर्चेला कधीही तयार, वेळ आणि ठिकाण तुम्हीचं सांगा: सुधीर फराटे

खाजगी कारखाना काढण्याच पाप अशोक पवारांनी केलं: दादा पाटील फराटे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सविंदणे विद्यालयात ‘अजितदादा एआय लॅब’चे उद्घाटन!

विद्यार्थ्यांना एआय, रोबोटिक्स, ड्रोन आणि थ्रीडी प्रिंटिंगचे मिळणार प्रात्यक्षिक शिक्षण; उच्च शिक्षणासाठी ठरणार उपयुक्त शिरूर…

5 तास ago

पुण्यात पाणीटंचाईचे संकट गडद! महापौर मंजुषा नागपुरेंचे प्रशासनाला कडक आदेश

पाणीगळती, पाणीचोरी आणि टँकरच्या काळाबाजारावर कारवाई होणार; पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांचे नळजोड तोडणार! पुणे :…

12 तास ago

शिरुर; न्हावरे रस्त्यावर दुचाकीवरुन पडुन जखमी झालेल्या २६ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील न्हावरा रोड येथे दुचाकीवरुन पडून गंभीर जखमी झालेल्या २६ वर्षीय…

13 तास ago

शिरूर तालुक्यात दिवसाढवळ्या चोरी; घरातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन…

14 तास ago

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात अखंड हरिनाम सप्ताहातून घरी परतणाऱ्या तिघांना ट्रकने चिरडले…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : आंबळे (ता. शिरूर) येथील अखंड हरिनाम सप्ताहातील खोले महाराज यांचा कीर्तनाचा…

15 तास ago

शिरूर! कारेगावात तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राचा वार करत थेट जीव घेण्याचा प्रयत्न…

कारेगाव (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात गुन्हेगारीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसतानाच कारेगाव येथे एका…

16 तास ago