मुख्य बातम्या

पुणे-नगर महामार्गावर युवती किंवा महिलांना लिफ्ट देताय…? सावधान…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात अनेक फसवणुकीचे प्रकार समोर येत असुन पुणे-नगर महामार्गावर जर एखाद्या युवतीने किंवा महिलेने तुम्हाला लिफ्ट मागितली. तर थोडं जपुन कारण तुमच्यासोबत एखादी अनुचित घटना घडू शकते. शिरुर तालुक्यात लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. पण ‘उगाच नको इज्जतीचा पंचनामा’ या भावनेने अनेकजण पोलिस स्टेशनला जाण्यास घाबरत असल्याने अनेक युवती आणि महिला या गोष्टीचा फायदा घेत ‘आर्थिक’ फसवणुक करत आहेत.

शिरुर तालुक्यातील एका गावातील राजकीय व्यक्तीला हा अनुभव आला आहे. आज रविवार (दि २४) रोजी दुपारी २ च्या सुमारास शिरुर येथुन कारेगावकडे जात असताना न्हावरे फाटा येथे एका महिलेने ‘या’ राजकीय व्यक्तीकडे लिफ्ट मागितली. त्यावेळी ‘त्या’ महिलेने विचारले तुम्हाला कुठे जायचं आहे. त्यावेळी ‘या’ राजकीय व्यक्तीने कारेगावला जायचे असल्याचे सांगितले.

त्यानंतर ‘ती’ महिला गाडीत बसली आणि कारेगाव येथे आल्यानंतर महिलेने मला उशीर झालाय, प्लिज मला रांजणगावला सोडा अशी विनंती केली. त्यानंतर ‘या’ राजकीय व्यक्तीने तिला रांजणगाव येथील ‘महागणपती’ च्या पार्किंग येथे सोडले. गाडीतुन उतरल्यानंतर ‘त्या’ महिलेने राजकीय व्यक्तीला तुमच्याकडे २०० रुपये सुट्टे पैसे आहेत का…? अशी विचारणा केली. तेव्हा ‘ त्या’ व्यक्तीने पैसे नाहीत असे सांगितले दिला. पण नंतर महिलेने जास्त गयावया केल्यानंतर त्याने पाकिट उघडून ‘त्या’ महिलेला २०० रुपये सुट्टे दिले.

 

पण ‘या’ राजकीय व्यक्तीच्या पाकिटात ‘चिक्कार’ पैसे असल्याचे पाहताच ‘त्या’ महिलेने मला ते पैसे दे असे म्हणत, तु माझी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने छेडछाड केल्याचा ‘कांगावा’ करत मोठयामोठयाने ओरडायला सुरवात केली. अन फोन कानाला लावत ‘साहेब लवकर या’ एकाने माझी छेड काढली आहे अस सांगत कोणाला तरी बोलावलं. त्यानंतर ‘या’ राजकीय व्यक्तीने समयसुचकता दाखवत गाडीतुन खाली उतरत त्याच्या मित्रांना फोन करुन ‘एक अनोळखी बाई मला ‘ब्लकमेल’ करत असल्याचे सांगितले.

 

त्यानंतर ‘ती’ बाई घाबरली आणि आपण केलेला हा खोटा प्रकार आपल्याच अंगलट आल्याचे लक्षात आल्यानंतर तिने रांजणगाव गणपती मंदिराच्या परिसरात धुम ठोकली. आज रविवार असल्यामुळे अनेक भाविक ‘महागणपती’ च्या दर्शनाला आले असल्याने मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत ‘ती’ बाई पसार झाली. ती राजकीय व्यक्ती आणि त्याच्या मित्रांनी सुमारे एक तास आजूबाजूच्या परिसरात ‘त्या’ बाईचा शोध घेतला पण तोपर्यंत ती पसार झाली होती. त्यामुळे भविष्यात पुणे-नगर महामार्गावर युवती किंवा महिलांना लिफ्ट देणे एखाद्या व्यक्तीला महागात पडू शकते हे आजच्या घटनेतुन सिद्ध झाले आहे.

शिरुर-हवेली मतदारसंघात माऊली कटके यांचा दणदणीत विजय

आंबेगाव-शिरूर मतदार संघातून दिलीप वळसे-पाटील विजयी

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव एमआयडीसीत बेकायदा पिस्तूल बाळगणारा जेरबंद; ३५ हजारांचा गावठी कट्टा जप्त

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) परिसरात बेकायदेशीररीत्या विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या एका व्यक्तीला…

40 मिनिटे ago

सहा महिन्यांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र’; जिल्हाध्यक्ष संजय पवारांचा मोठा दावा, ‘घड्याळ’ चिन्हावर लढणार निवडणुका?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे.…

43 मिनिटे ago

‘मित्रपक्षाची साथ मिळाली नाही’; पुण्यातील पराभवावर सचिन अहिरांची खंत, संघटना बळकट करण्याचा निर्धार

पुणे: विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी पुण्यात शिवसेनेला अपेक्षित यश न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त…

56 मिनिटे ago

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची मोठी हानी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव…

1 तास ago

स्टार प्रवाहवर मोठा बदल! ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’च्या आगमनासोबत ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेचा निरोप

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवर कार्यक्रमांच्या वेळापत्रकात मोठे बदल सुरू असून प्रेक्षकांसाठी नव्या मालिकांची मेजवानी…

2 तास ago

‘गुंगी गुडिया’वरून राष्ट्रवादीचा काँग्रेसवर पलटवार; महिलांचा अवमान थांबवा, उमेश पाटील यांची मागणी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यावरील काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टवरून…

3 तास ago