शिरूर (तेजस फडके): आंबेगाव-शिरूर मतदार संघातून अजित पवार गटाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांचा ११०० मतांनी विजय झाला आहे. दुसरीकडे शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांचा निसटता पराभव झाला आहे.
आंबेगाव मतदार संघात गुरु-शिष्यामध्ये लढत पाहायला मिळाली. या लढतीत दिलीप वळसे-पाटील यांनी विजय मिळवला आहे. या मतदार संघातून दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदारकीसाठी उभे होते. त्यांना देवदत्त निकम आव्हान होते.
दिलीप वळसे-पाटील यांचा हा विजय डबल नेमच्या खेळीने झाला आहे. दिलीप वळसे पाटील यांनी देवदत्त जयवंतराव निकम यांच्या विरोधात देवदत्त शिवाजी निकम यांना अपक्ष म्हणून रिंगणात उभे केले होते. शरद पवार यांच्या देवदत्त निकम यांचे चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस तर अपक्ष देवदत्त निकम यांचे चिन्ह हे ट्रम्पेट होते. ट्रॅम्पेट हे चिन्ह लोकसभेवेळी तुतारी नावाने ओळखले जायचे. याचा फायदा दिलीप वळसे पाटील यांनी करून घेण्याची खेळी केली, जी वळसेंना तारणारी ठरली. कारण वळसेंचा विजय हा अवघ्या ११०० मतांनी झाला, तेव्हा अपक्ष देवदत्त शिवाजी निकम यांना 2900 हून अधिक मतं मिळाली आहेत.
दरम्यान, शरद पवार यांचे देवदत्त निकम यांच्यासमोर अपक्ष देवदत्त शिवाजी निकम हे साधर्म्य असणारे उमेदवार नसते तर साहजिकच ही 2900 मते शरद पवार यांचे उमेदवार देवदत्त निकम यांना मिळाली असती. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांनी नावात साधर्म असणाऱ्या देवदत्त निकम यांना उभं करण्याचा डाव टाकला नसता तर कदाचित वळसे पाटील यांचा पराभव झाला असता, अशी चर्चा मतदार संघात रंगली आहे.
आंबेगाव-शिरूर विधानसभा निवडणूकीचा Live निकाल…
शिरूर-हवेली विधानसभा निवडणूकीचा Live निकाल…
…तर मी उमेदवारी मागे घेईनः दिलीप वळसे पाटील
शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावात किती मतदान झाले; पाहा सविस्तर आकडेवारी…
कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झाल, जाणून घ्या…
राज्यात कोणाची सत्ता येणार, सर्व एक्झिट पोल्सचे निकाल जाणून घ्या…
विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदात्यांचा वाढता टक्का