मुख्य बातम्या

भारतीय सैन्यदलात २४ वर्षे सेवा करणारे भोयरे पठार गावचे नायब सुभेदार संतोष आंबेकर यांचा गौरव

शिरुर (तेजस फडके) भारतीय सैन्य दलामध्ये तब्बल दोन तप म्हणजेच २४ वर्षे सेवा करुन नायब सुभेदार (एम.ए.सी.पी.) या पदावरती मॅकॅनाईज इंन्फंट्री, अहिल्यानगर येथुन सेवानिवृत्त झालेले भोयरे पठार गावचे सुपुत्र संतोष सुर्यभान आंबेकर यांचा त्यांच्या मुळगावी भोयरे पठार/खुर्द, ता.जि.अहिल्यानगर येथे ग्रामस्थांच्या वतीने सेवानिवृत्ती गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंबेकर कुटुंबियांसोबत त्यांचे नातेवाईक तसेच ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.

 

अहिल्यानगर जिल्ह्यातील भोयरे पाठर/खुर्द, येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले संतोष सुर्यभान आंबेकर हे सन २००० मध्ये अहमदनगर येथील मॅकॅनाईज इंन्फंट्री (MIRC) मध्ये सैन्यदलात भरती झाल्यानंतर त्यांनी मध्यप्रदेश मधील बबिना, राजस्थान, जम्मु कश्मीर, दिल्ली, पंजाब, लेह, लडाख इत्यादी ठिकाणी तसेच दक्षिण आफ्रिका मधील सुदान देशामध्ये शांतीसैनिक म्हणुन देखील दोन वर्षे सेवा केली आहे. लडाख येथील चिन सिमा भागात नोकरी करतांना अनेक नैसर्गीक संकटांचा सामना करुन ते डिसेंबर २०२४ मध्ये परत अहिल्यानगर येथील मॅकॅनाईज इंन्फंट्री (MIRC) येथे रिपोर्टीग केल्यानंतर संतोष आंबेकर हे दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी भारतीय सैन्य दलामध्ये २४ वर्षे सेवा करुन नायब सुभेदार (एम.ए.सी.पी.) या पदावरती मॅकॅनाईज इंन्फंट्री, अहिल्यानगर येथुन सेवानिवृत्त झाले आहेत.

 

त्यांच्या सेवानिवृत्ती गौरव सोहळा कार्यक्रमाचे त्यांचे मुळगावी भोयरे पठार/खुर्द येथे आयोजन करण्यात आले होते. आंबेकर कुटुंबीय व त्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या दिमाखामध्ये संतोष आंबेकर व त्यांची पत्नी जया आंबेकर व त्यांचे आई -वडील तसेच तिरंगा झेंड्‌यासह देशभक्तीपर गीते लावुन रॅली काढुन सन्मानपूर्वक त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यात आले. मॅकॅनाईज इंन्फंट्री (MIRC) येथुन सैन्यदलाच्या वतीने निरोप देतांना उपस्थितांनी तसेच संतोष आंबेकर यांच्या मातोश्री साळुबाई आंबेकर आणि वडील सुर्यभान गणपत आंबेकर हे भावुक झाल्याचे दिसुन आले.

 

या सेवापुर्ती गौरव सोहळ्यास माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, माजी पंचायत समिती सदस्य रामदास भोर, राजीव गांधी पतसंस्थेचे अध्यक्ष उध्दवराव दुमूंगे, भोयरे खुर्दचे सरपंच राजु आंबेकर भोयरे पठारचे सरपंच बाबासाहेब टकले, उपसरपंच राजेश बोरकर, कौडेश्वर माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अशोक मुठे, सदस्य शंकर मुठे, अंश्याबापु उरमुडे, विक्रम आंबेकर, देवराम कोल्हे, ठकाराम टकले व इतर माजी सैनिक आवर्जून उपस्थित होते. रांजणगावचे उद्योजक संदिप कुटे, विजय डिंबर, तसेच भोयरे पठार व भोयरे खुर्द गावाचे ग्रामस्थ, वाकोडी फाटा, दरेवाडी येथील आजी-माजी सैनिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहत संतोष आंबेकर यांना सेवापुर्तीच्या शुभेच्छा देत त्यांचे स्वागत केले आहे.

 

तसेच कुटूंबियांच्या वतीने सोनाली संदिप बुगे, निकीती बुगे, तनुजा आंबेकर, संस्कृती आंबेकर, समीर गुंजाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करत भावानांना वाट मोकळी करुन दिली. यावेळी सेवानिवृत्ती कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व पाहुणे मंडळी, नातेवाईक, राजकिय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे आंबेकर कुटूंबियांच्या वतीने विलास आंबेकर व आनंद (रिंकु) आंबेकर यांनी आभार व्यक्त केले.

शिरुर; माजी सैनिकाच्या पत्नीची कंपनीच्या भागीदारीत फसवणुक करत जिवे मारण्याची धमकी

कुणी न्याय देईल का न्याय’ माजी सैनिकाच्या पत्नीची आर्त हाक; आरोपी अद्यापही मोकाट

माजी सैनिक पत्नीच्या आर्थिक फसवणुक प्रकरणी आमदारांच्या फोन नंतरही आरोपीना अटक नाहीच; पोलिसांची भुमिका संशयास्पद…?

शिरुर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर माजी सैनिक पत्नीचा गंभीर आरोप; पोलिस अधिक्षकांकडे तक्रार

शिक्रापुरचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांची दंबग कामगिरी, दोन स्कॉर्पिओ सह ५३ किलो गांजा केला जप्त

Video: शिरुर तालुक्यातील कडबा पेंढी चोर झाला सीसीटीव्हीत कैद; ओळखा कोण…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

11 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

11 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

11 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

12 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

12 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

12 तास ago