न्हावरे (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील अरणगाव गावठाण हद्दीतून शासनाची कुठलीही परवानगी न घेता हजारो ब्रास गौणखनिज मुरुमाचे उत्खनन झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. जेसीबी क्रं (एमएच ४२ बीजे ९७४६) व ट्रॅक्टरच्या सहाय्याने झालेले हे उत्खनन ग्रामस्थांच्या रोषाचा विषय ठरत असून, महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांनीही यात संगनमत करुन मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे.
याबाबत राजेंद्र बापूराव टेमगिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ग्राम महसूल अधिकारी प्रशांत कांबळे व गाव कामगार तलाठी योगेश टिळेकर यांनी बाळासो माधव ढवळे यांच्या संगनमताने वरिष्ठ कार्यालयाला चुकीचा अहवाल सादर केला असल्याचा आरोप टेमगिरे यांनी केला आहे.
पंचनाम्यात फेरफार…?
१३ ऑगस्ट २०२५ रोजी पंचनामा करताना पंच नेमिनाथ तांबे, प्रवीण ढवळे आणि ऋषिकेश मखर यांच्या उपस्थितीत लांबी ९५ फूट, रुंदी ३० फूट व उंची ९ फूट असा तपशील नोंदवला गेला. मात्र वरिष्ठ कार्यालयाला पाठविलेल्या अहवालात रुंदी फक्त २० फूट दाखवून खरे तथ्य लपविण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थ व तक्रारदार राजेंद्र टेमगिरे यांचीच नव्हे तर शासनाचीही उघडपणे फसवणूक झाल्याचा आरोप होत आहे.
कुंपणच शेत खातय का…?
तक्रारदार राजेंद्र टेमगिरे यांनी अवैध उत्खननाबाबत ठोस पुरावे व अवैध उत्खननाचा व्हिडिओही महसूल विभागाला सादर केलेला असूनही प्रशासन गप्प बसुन कारवाईला टाळाटाळ करत आहे. त्यामुळे यात ‘कुंपणच शेत खातय’ अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
प्रशासन मौन का…?
याबाबत शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे शिरुरचे तहसीलदार जेसीबी व ट्रॅक्टरवर कारवाई करणार का…? तसेच बाळासो ढवळे यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार का…? आणि पंचनामा बदलणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार की त्यांच्यावर कठोर कारवाई करणार…? तसेच तक्रारदाराला न्याय मिळणार का…? याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.
(क्रमशः)
गुनाट-शिंदोडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ७० लाख रुपये मंजुर
रांजणगाव पोलिसांनी अपहरण झालेल्या तीन वर्षाच्या मुलाची केली पंजाबमधून सुटका
Video; विसापुर-शिरुर एसटी वाहकाला मुजोर तरुणाची मारहाण
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …