मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात भाजपाची अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर; तालुक्यातील पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांची नाराजी…?

शिरुर (तेजस फडके) भाजपाचे शिरुर शहराध्यक्ष नितीन पाचर्णे यांनी शहराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ शिरुरमधी‌ल भाजपच्या महीला मोर्चा आघाडीच्या अध्यक्ष प्रिया बिराजदार व सरचिटणीस शुभांगी पाचर्णे यांच्या सहीत १६ महीला पदाधिकाऱ्यांचे राजीनामे तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्याकडे आज (दि ५) जुलै रोजी निसर्ग गार्डन मंगल कार्यालयात पक्षाच्या मिटींगमध्ये सुपुर्द करण्यात आल्याने खळबळ माजली असुन विधानसभा निवडणुकीपुर्वी शिरुर शहरातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

स्वर्गीय आमदार लोकनेते बाबुराव पाचर्णे यांनी शिरुर तालुक्यात भाजपा पक्ष वाढीसाठी खुप प्रयत्न केले होते. तसेच त्यांनी शिरुर व हवेली या दोन्ही तालुक्यात प्रचंड मोठया प्रमाणात पक्ष संघटन केले होते. परंतु पाचर्णे यांच्या निधनानंतर मात्र भाजपच्या एकाही स्थानिक नेत्याला किंवा पदाधिकाऱ्याला ते पक्ष संघटन टिकवता आले नाही. त्यामुळे भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांना स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांच्यानंतर पक्षात कोणीही तेवढ्या ताकतीचा नेता उरला नाही. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला शिरुरमधून उध्वस्त होऊ लागला आहे.

 

याउलट राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यानंतर शिरुर तालुक्यातील सगळेच बडे नेते अजित पवारांसोबत गेले. मात्र आमदार अशोक पवार यांनी मात्र शरद पवारांसोबत राहणे पसंत केले. लोकसभा निवडणुकीत शरद पवार व अशोक पवार यांना सर्वसामान्य जनतेने साथ दिल्याने डॉ अमोल कोल्हे यांना शिरुर-हवेलीतुन मताधिक्य मिळाले. शिरुर तालुक्यातील स्वर्गीय आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या तर्डोबाचीवाडी गावात शिवाजीराव आढळराव पाटील यांना मताधिक्य मिळाले. असे असतानाही स्वर्गीय आमदार पाचर्णे यांचे पुतणे नितीन पाचर्णे यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचं कारण काय…? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

शिरुरच्या पदाधिकाऱ्यांच्या कायमच दौंड तालुक्यात वाऱ्या…?

शिरुर तालुक्यातील भाजपाचे अनेक पदाधिकारी हे कायमच दौंड तालुक्यात असतात. शिरुरचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी शिरुर मधील कार्यकर्त्यांशी संपर्कात राहणे गरजेचे असताना दौंड तालुक्यात जाऊन स्वतःची वैयक्तिक कामे ते करत असतात. त्यामुळे पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्ते त्यांच्यावर प्रचंड मोठया प्रमाणात नाराज आहेत. भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी सत्तेचा फायदा घेत स्वतःचा विकास केल्याचीही दबक्या आवाजात जोरदार चर्चा आहे.

 

शिरुर तालुक्यात भाजपा पक्ष संघटना फक्त नावापुरतीच…?

पदाधिकारी पक्षात संघटनात्मक काम करायच सोडुन कार्यकर्त्यांचे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. फक्त आलिशान वातानुकुलीत गाडीत बसुन पक्ष वाढतं नाहीत. तर त्यासाठी शिरुरचे सालकरी आमदार स्व बाबुराव दौंडकर, स्व. संभाजीराव भुजबळ, लोकनेते आमदार स्व बाबुराव पाचर्णे यांच्या सारखं सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळुन त्यांच्या व्यथा आणि अडचणी जाणून घ्याव्या लागतात अशी प्रतिक्रिया भाजपाच्या एका जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

खळबळजनक! शिरुर शहरातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

शिरुर तालुक्यात भाषणबाजीत महिला आघाडीवर; महिलांच्या शुभाशिर्वादाने एक आगळावेगळा शुभविवाह संपन्न

शिरुरच्या माजी नगरसेविका ज्योती लोखंडे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश; अजुनही काहीजण इच्छुक

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

10 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago