शिरुर (अरुणकुमार मोटे) भाजपाचे शिरुर शहराध्यक्ष नितीन पाचर्णे यांनी शहराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ शिरुरमधील भाजपच्या महीला मोर्चा आघाडीच्या अध्यक्ष प्रिया बिराजदार व सरचिटणीस शुभांगी पाचर्णे यांच्या सहीत १६ महीला पदाधिकाऱ्यांचे राजीनामे तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्याकडे आज (दि ५) जुलै रोजी निसर्ग गार्डन मंगल कार्यालयात पक्षाच्या मिटींगमध्ये सुपुर्द करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला शिरुरमधून उध्वस्त होऊ लागला आहे.
पक्ष पदाधिकाऱ्यांना कोणतेही सहकार्य करत नाही. वरीष्ठ पदाधिकारी फोन उचलत नाही. शासकीय अधिकाऱ्यांशी जनतेच्या कामांसंदर्भात कुठलाही संपर्क करत नाही. या कारणामुळे शिरुर शहरातील पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याचे महीला आघाडी सरचिटणिस शुभांगी पाचर्णे यांनी सांगितले आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा शहर पदाधिकारी यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद होती. शिरुर तालुक्यातील मताधिक्यापेक्षा शिरुर शहरातील मताधिक्य खासदार डॉ अमोल कोल्हे यांना त्या तुलनेत फार कमी झाले आहे. यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी मोलाचे कष्ट केले होते.
आता येणाऱ्या आगामी विधानसभा, जिल्हा परीषद पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकीत भाजपाचा बुरुज ढासळत असल्याने राजकारणात अनेक नवीन बदल पाहवायास मिळतील हे नक्की…
(क्रमश:)
शिरुर येथील सुरेश पाचर्णे यांची पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरास दिली १ लाख १ हजार १११ रुपयांची देणगी
घोडगंगा कारखान्याच्या कर्जावरून अशोक पवारांचे थेट अजित पवारांना चॅलेंज…
शिरुर तालुक्यात दोन शिक्षकांची शिक्षणविस्तार अधिकाऱ्यास मारहाण; दोघांवरही निलंबनाची कारवाई
Video: शिरूर तालुक्यात दुचाकींची समोरासमोर जोरात धडक; जागीच मृत्यू…
‘आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं,’ अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती : चंदन सोंडेकर