खळबळजनक! शिरुर शहरातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

शिरुर (अरुणकुमार मोटे) भाजपाचे शिरुर शहराध्यक्ष नितीन पाचर्णे यांनी शहराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ शिरुरमधी‌ल भाजपच्या महीला मोर्चा आघाडीच्या अध्यक्ष प्रिया बिराजदार व सरचिटणीस शुभांगी पाचर्णे यांच्या सहीत १६ महीला पदाधिकाऱ्यांचे राजीनामे तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्याकडे आज (दि ५) जुलै रोजी निसर्ग गार्डन मंगल कार्यालयात पक्षाच्या मिटींगमध्ये सुपुर्द करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला शिरुरमधून उध्वस्त होऊ लागला आहे.

पक्ष पदाधिकाऱ्यांना कोणतेही सहकार्य करत नाही. वरीष्ठ पदाधिकारी फोन उचलत नाही. शासकीय अधिकाऱ्यांशी जनतेच्या कामांसंदर्भात कुठलाही संपर्क करत नाही. या कारणामुळे शिरुर शहरातील पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याचे महीला आघाडी सरचिटणिस शुभांगी पाचर्णे यांनी सांगितले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा शहर पदाधिकारी यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद होती. शिरुर तालुक्यातील मताधिक्यापेक्षा शिरुर शहरातील मताधिक्य खासदार डॉ अमोल कोल्हे यांना त्या तुलनेत फार कमी झाले आहे. यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी मोलाचे कष्ट केले होते.

आता येणाऱ्या आगामी विधानसभा, जिल्हा परीषद पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकीत भाजपाचा बुरुज ढासळत असल्याने राजकारणात अनेक नवीन बदल पाहवायास मिळतील हे नक्की…
(क्रमश:)

शिरुर येथील सुरेश पाचर्णे यांची पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरास दिली १ लाख १ हजार १११ रुपयांची देणगी

घोडगंगा कारखान्याच्या कर्जावरून अशोक पवारांचे थेट अजित पवारांना चॅलेंज…

शिरुर तालुक्यात दोन शिक्षकांची शिक्षणविस्तार अधिकाऱ्यास मारहाण; दोघांवरही निलंबनाची कारवाई

Video: शिरूर तालुक्यात दुचाकींची समोरासमोर जोरात धडक; जागीच मृत्यू…

‘आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं,’ अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती : चंदन सोंडेकर

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

20 तास ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

22 तास ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

1 दिवस ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

1 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

2 दिवस ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

2 दिवस ago