मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात जन्मदात्या बापाकडूनच मुलाच्या खुनाचा प्रयत्न

शिक्रापूर (शेरखान शेख) शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी जमिनीचे वाद विकोपाला गेलेले असताना काहींचे प्राण देखील गेले आहेत, कालच केंदूर मध्ये एका युवकाने बहिणीचा कोयत्याने खून केला असल्याची घटना घडली असताना आता सणसवाडी मध्ये जन्मदात्या बापा सह चुलत्याने युवकाला मारण्याची सुपारी दिल्याची घटना समोर आल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे युवकाचा बाप सुनील नामदेव हरगुडे, चुलता गणेश नामदेव हरगुडे यांच्या सह तीन अनोळखी युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Ranjangaon marathon

सणसवाडी (ता. शिरुर) येथील कुणाल हरगुडे या युवकाचे आजोबा नामदेव हरगुडे यांनी त्यांच्या नावावर असलेली जमीन नातू कुणालच्या नावावर केलेली आहे. तसेच कुणालची चुलती ग्रामपंचायत निवडणूकसाठी उभी असताना तिचा पराभव झाल्याने कुणालने विरोधात काम केल्याचा त्याचे वडील सुनील व चुलता गणेश यांचा संशय असल्याने ते दोघे कुणालवर चिडून आहेत. 9 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास कुणाल हा त्याच्या स्विफ्ट कार क्रं एम एच १२ एस यु ४७४७ मधून तळेगाव ढमढेरे रस्त्यावरुन घरी येत असताना तीन युवक कार मधून आले त्यांनी कुणालला अडवून त्याच्या गाडीची काच फोडून, डोक्याला पिस्तुल लावून चाकुने वार करत तुला माज आला आहे काय, आम्हाला तुझ्या बापाने आणि चुलत्याने पाठवले आहे, इलेक्शनला विरोधात काम करतो का तुझ्याकडे बघतोच, बापाची आणि चुलत्याची जमीन तुझ्या नावावर करुन घेतो काय असे म्हणून तुझ्या नावावरील जमीन आठ दिवसात तुझ्या बापाच्या नावावर करुन दे नाहीतर सगळ्या गोळ्या आरपार करतो अशी धमकी देत त्याच्यावर हल्ला करत कुणालचा मोबाईल फोडून टाकला.

याबाबत कुणाल सुनील हरगुडे (वय २१) रा. सराटे वस्ती सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सुनील नामदेव हरगुडे, गणेश नामदेव हरगुडे दोघे रा. सराटेवस्ती,सणसवाडी, ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहे.

रक्ताच्या नात्यालाच काळिमा फासणाऱ्या घटना….

शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथे यापूर्वी एका जन्मदात्या बापाने आपल्या मुलीचा नदीत फेकून खून केल्याची घटना ताजी असताना नुकतेच एका भावाने जमिनीच्या वादातून आपल्या चुलत बहिणीवर कोयत्याने वार करुन खून केला तर आता सणसवाडी येथे देखील जन्मदात्या बापानेच मुलाच्या खुनाची सुपारी देत मुलाचा खून करण्याचा प्रयत्न केल्याने शिरुर तालुक्यात नात्याला काळिमा फासण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

4 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago