कारेगाव (तेजस फडके) कारेगाव येथील यश इन चौकात कत्तलीसाठी जाणाऱ्या 5 जनावरांना वाचविण्यात शिरुर तालुक्यांतील बजरंग दलाच्या गोरक्षकांना यश आले असुन चारचाकी मालवाहू टेम्पोच्या चालकासह दोन जणांवर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये गोवंश हत्याबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दि 27 मे 2024 रोजी सकाळी 11 च्या सुमारास गोरक्षक विशाल शिंदे हे रांजणगाव वरुन शिरुर कडे येत असताना एक चारचाकी मालवाहतूक टेम्पो क्रं (एम एच 12 जे एफ 2326) ही गाडी गोवंश भरुन शिरुरच्या दिशेने जात असताना त्यांना दिसली. त्यांना संशय आल्याने त्यांनी कोणताही विलंब न करता ही सर्व माहिती त्यांचे सहकारी बजरंग दलाचे जिल्हा सहप्रमुख अजिंक्य तारु यांना सांगितली.
त्यांनी तातडीने रांजणगाव पोलिस स्टेशनला हि बाब कळवत कारेगाव येथील यश इन चौकात सापळा रचून पोलिसांच्या मदतीने हि गाडी पकडली असता यात 1 गावरान गाई आणि 4 वासरे दाटीवाटीने भरलेली दिसली. त्यांनी चालकाकडे अधिक विचारपुस केली असता हि सर्व जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे कळताच गौरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने त्वरीत रांजणगाव पोलिस स्टेशनला हि गाडी जमा केली. तसेच टेम्पो चालकासह दोन जणांवर गोवंश हत्याबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करत वाचवलेले 5 गोवंश श्री गौरक्षण पांजरपोळ संस्था,शिरुर येथे सुखरुप सोडण्यात आले.
या कारवाईत बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक अजिंक्य तारु, बजरंग दलाचे गोरक्षक विशाल शिंदे, बजरंग दलाचे रांजणगाव संयोजक रवी जगदाळे, प्रतीक शर्मा, नानासाहेब लांडे, गोरक्षक विशाल पवार, अदित्य सणसे, रविंद्र बैनाडे, लोकेश शर्मा, रोहीत दरडा आदी गोरक्षकांनी भाग घेतला. हि कारवाई यशस्वी करण्यासाठी रांजणगाव एमआयडीसी (MIDC) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व महिला पोलीस उपनिरीक्षक सविता काळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
शिरुर तालुक्यातील 33 शाळांचा इयत्ता 10 वीचा शंभर टक्के निकाल
शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव गणातून पंचायत समिती निवडणूक लढवणार आहे, असा ठाम विश्वास…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २७) दुपारी एक भावनिक…
शिरूर : राज्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील पारोडी गावातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली सुप्रसिद्ध पिरसाहेबांची पारंपरिक यात्रा…
शिंदोडी (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर चिंचणी येथील जिल्हा परिषद शाळेत माजी…
पाबळ (सुनिल जिते) : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण निश्चिती झाल्याने तयारी सुरु झाली…