महाराष्ट्र

गडचिरोलीत उभारणार ग्रीन स्टीलचे जागतिक केंद्र; जॉन कॉकरिलसोबत महाराष्ट्राचा सामंजस्य करार

मुंबई: महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडसोबत स्वाक्षरी करण्यात आली आहे. हा करार केवळ औद्योगिक गुंतवणुकीपुरता मर्यादित नसून गडचिरोलीला ग्रीन स्टील उत्पादनाचे जागतिक केंद्र बनविण्याच्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा पाया असल्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

या करारासंदर्भात आयोजित बैठकीला जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. फ्रेडरिक मार्टिन, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगन, राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जागतिक गुंतवणूक, अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि शाश्वत औद्योगिक विकासाला चालना देणारे अग्रगण्य राज्य म्हणून पुढे जात आहे. गडचिरोलीतील प्रस्तावित उपक्रमामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक परिवर्तनाला मोठी गती मिळेल, असे रावल यांनी सांगितले.

या प्रकल्पातून हरित तंत्रज्ञान, मोठ्या प्रमाणातील गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासाला चालना मिळणार आहे. स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याबरोबरच विदर्भातील नैसर्गिक व खनिज संपत्तीला पर्यावरणपूरक उत्पादन प्रक्रियेची जोड देऊन शाश्वत औद्योगिक विकासाचे मॉडेल उभारले जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक आणि प्रवासी भारतीय संपर्क विभागाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय औद्योगिक भागीदारी मजबूत केली जात आहे. जॉन कॉकरिलसोबतची भागीदारी महाराष्ट्राला ग्रीन स्टील उत्पादन आणि निर्यातीच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर नवे स्थान मिळवून देईल, असा विश्वास रावल यांनी व्यक्त केला.

४ सप्टेंबर रोजी बेल्जियमच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत या सामंजस्य कराराची औपचारिक देवाणघेवाण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हरित औद्योगिक विकासाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्यास मदत होणार आहे.

या प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या, धोरणात्मक प्रोत्साहन, सुलभ सुविधा आणि उद्योगपूरक परिसंस्था शासनाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच स्थानिक युवकांच्या कौशल्य विकासावर विशेष भर दिला जाणार असल्याचे रावल यांनी स्पष्ट केले.

गडचिरोलीची ओळख केवळ नैसर्गिक संपत्तीचा जिल्हा म्हणून न राहता ग्रीन स्टील, नवोपक्रम आणि शाश्वत उद्योगांचे जागतिक केंद्र म्हणून निर्माण करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे, असेही रावल यांनी सांगितले. जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडने महाराष्ट्रावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी कंपनीचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

17 मिनिटे ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

18 मिनिटे ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

21 मिनिटे ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

24 मिनिटे ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

26 मिनिटे ago

अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नका; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना इशारा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या मुद्द्यावरून…

2 तास ago