मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातील सविंदणे गावचे अरुणकुमार मोटे ‘निर्भीड पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित

शिरुर (तेजस फडके) ‘दैनिक प्रभात’ तसेच ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ चे निर्भीड पत्रकार अरुणकुमार मोटे यांना आज (दि १५) ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन ‘रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिरुर शहर’ यांच्या संयुक्त विद्यमाने शिरुर-हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार, तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या हस्ते निर्भीड पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

पत्रकार अरुणकुमार मोटे यांनी तालुक्यातील महसूल विभाग, पोलिस विभाग, शिक्षण विभाग, पंचायत समिती, नगरपालिका प्रशासन या ठिकाणी सामन्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी निर्भिडपणे वृत्तांकन करत बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. ते गेल्या अनेक दिवसांपासून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेच्या माध्यमातून परखड भुमिका मांडून उरलेल्या तीन आधारस्तंभांवर लक्ष ठेवण्याचे काम करत आहेत. बातमी बरोबरच त्या बातमीतील घटना, घटना घडण्यामागे असलेले राजकीय सामाजिक व आर्थिक प्रवाह व शक्ती आणि घटनांचे संभाव्य परिणाम यांचे विश्लेषण करुन वाचकांपर्यंत ते पोहचवत असतात.

 

त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या या कामाची दखल घेऊन ‘रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणीताई कर्डीले तसेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिरुर शहर’ यांच्या संयुक्त विद्यमाने शिरुर-हवेलीचे आमदार पवार तसेच शिरुरचे तहसिलदार म्हस्के यांच्या हस्ते निर्भीड पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष महिला अध्यक्ष डॉ स्मिता कवाद, युवती अध्यक्षा गीता आढाव, नगरपालिका शिरुर मुख्याधिकारी स्नेहा काळे, पंचायत समिती गटविकास अधिकारी महेश डोके, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शासकीय कर्मचारी अधिकारी, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, महिला भगिनी, पत्रकार बांधव आदी उपस्थित होते.

मुंबई: शिरुरचे आरटीआय कार्यकर्ते अशोक भोरडे यांचे विविध मागण्यासाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु

शिरुर तालुक्यातील गुनाट येथे सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला ध्वजारोहणचा मान

शिरुर तालुक्यात पतीच्या नातेवाईकाकडुन विवाहित महिलेचा विनयभंग

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

5 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago