मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातील शिंदोडी गावावर शोककळा; 11 के व्ही विद्युत तारेचा धक्का बसल्याने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू

शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी (ता.शिरुर) येथे 11 के व्ही ए विद्युत तार अचानक तुटून ऊसाच्या शेतात पडल्यामुळे विजेचा धक्का बसल्याने अक्षय धुळा हाके (वय 27) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा तरुण आज (दि 14) रोजी दुपारी 12 च्या आसपास हि घटना घडली. हा तरुण ऊसाच्या शेतात पाणी धरत असताना ऊसाच्या शेतात पडलेली विजेची तार न दिसल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार अक्षय ऊर्फ बाळू हाके हा घराच्या जवळच असलेल्या ऊसाच्या शेतात पाणी धरत होता. त्याच्या शेताजवळच महावितरणची 11 के व्ही ए क्षमतेची विद्युत वाहिनी गेली होती. दुपारी अचानक विजेच्या खांबावरील एक तार तुटली आणि ऊसाच्या शेतात पडली. अक्षय तिथेच ऊसाला पाणी देत असल्यामुळे या विजवाहक तारेचा धक्का बसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

शिंदोडी ग्रामस्थ हळहळले…

अक्षय हा शांत, सुस्वभावी अन मनमिळावु मुलगा होता. त्याला क्रिकेटची आवड होती. त्यामुळे शिंदोडीसह आसपासच्या गावात अक्षयचा मोठा मित्र परिवार होता. अक्षयच्या अकाली निधनाने शिंदोडी गावासह आसपासच्या गावातही शोक व्यक्त केला जात आहे. अक्षयच्या निधनानंतर त्याच्या क्रिकेटच्या खेळाचे व्हिडीओ स्टेटला ठेवत अनेकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली.

हाके कुटुंबावर दुःखाचा डोंगर…

अक्षय चे वडील धुळा हाके यांचाही अगदी तरुण वयात मृत्यू झाला होता. त्यानंतर खडतर परिस्थितही अक्षयच्या आईने अक्षय आणि त्याच्या मोठया भावाचा सांभाळ केला होता. परंतु अक्षयचा असा अकाली मृत्यू झाल्यामुळे हाके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अक्षयच्या पाठीमागे आई, भाऊ, चुलते, चुलतभाऊ असा मोठा परिवार आहे.

विजेचे जुने खांब बदलण्याची मागणी…

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार 11 के व्ही ए च्या विद्युत वाहिनीचे काम हे अंदाजे 1975-76 साली झालेले असुन त्यातील विजवाहक तारा जीर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे तार तुटली अन अक्षयचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे त्या विजवाहक तारा अन खांब बदलण्यात यावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

12 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

12 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

12 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago