महाराष्ट्र

जेजुरीच्या विकासासाठी श्रद्धा आणि समाजसुधारणेचा समतोल आवश्यक; डॉ. नीलम गोऱ्हे

जेजुरी: जेजुरी देवस्थानच्या प्रगती व सर्वांगीण विकासासाठी राज्य स्तरावर अनेक बैठका घेण्यात आल्या असून, श्रद्धेला धक्का न लावता सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात आला आहे, असे प्रतिपादन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

जेजुरी येथे श्री खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी श्री खंडोबाची विधिवत पूजा करून राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी तसेच महायुती सरकारच्या माध्यमातून जनहिताची कामे अधिक वेगाने पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली. देवस्थानचे विश्वस्त अॅड. विश्वास पानसे यांनी शाल, श्रीफळ आणि खंडोबाची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. कोविड काळात घडशी समाजाला दिलेल्या मदतीबद्दल घडशी समाजाच्यावतीनेही त्यांचा गौरव करण्यात आला.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, जेजुरीतील मुरळी प्रथा बंद करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. धर्म आणि परंपरेचा आदर राखत समाजसुधारणा साध्य होऊ शकते, हे या परिवर्तनातून सिद्ध झाले आहे. समाजातील विविध घटकांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

जेजुरीतील भंडाऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हळदीबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी सेंद्रिय हळदीच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. रासायनिक व बनावट हळदीमुळे भाविकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून मंदिराच्या ऐतिहासिक वास्तूलाही नुकसान पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सेंद्रिय हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून शुद्ध हळद उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी त्यांनी श्री मार्तंड देवसंस्थानला वैयक्तिकरित्या २१ हजार रुपयांची देणगी धनादेशाद्वारे दिली.

देवस्थानच्या जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी जेजुरीच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. लाखो भाविकांसाठी आधुनिक सुविधांनी युक्त भक्तनिवास उभारण्याची गरज असून, यासाठी स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे पुढाकार घ्यावा, असे त्या म्हणाल्या.

वाराणसीच्या धर्तीवर जेजुरीमध्ये धार्मिक पर्यटनाला चालना देणारा कॉरिडॉर विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत, विकासकामांमध्ये स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि विश्वास हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी अधोरेखित केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

18 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago